मुंबई – व्हॉट्सअॅपची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेच आहे. युजर्ससाठी त्यात काही ना काही सातत्याने नवीन येत असते. आता व्हॉट्सअॅप लवकरच एक नवीन प्रायव्हसी पॉलिसी आणणार आहे. ती स्वीकारली तरच तुम्हाला तुमचे अकाऊंट वापरता येईल, अन्यथा ते डिलीट करावे लागेल. WABetaInfo ने यासंदर्भात एक स्क्रीनशॉट प्रसिद्ध केला आहे.
व्हॉट्सअॅपची ही नवीन प्रायव्हसी पॉलिसी ८ फेब्रुवारी २०२१ मध्ये लागू होणार आहे. ही पॉलिसी जर तुम्हाला मान्य नसेल तर तुम्ही तुमचा अकाऊंट वापरू शकणार नाही. ही पॉलिसी अमलात आणायची तारीख कदाचित बदलू शकते. याची घोषणा पुढच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. पण तुम्हाला जर या अॅपचा वापर करायचाच असेल तर पॉलिसी मान्य करण्यावाचून दुसरा पर्याय नसल्याचे कंपनीच्या प्रवक्त्याने परदेशी प्रसारमाध्यमांना सांगितले.