नाशिक – कोरोना तपासणीच्या प्रकरणावरुन दातार कॅन्सर जेनेटिक्सने जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना खुले आव्हान दिले आहे. दातार जेनेटिक्सच्यावतीने एक प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, केंद्रीय संस्था असलेल्या एनआयव्हीकडे नमुन्यांची फेरतपासणी करावी. त्यात जर विसंगती आढळली नाही तर जिल्हाधिकारी मांढरे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा, असे दातार जेनेटिक्सने म्हटले आहे. शिवाय या प्रकरणावरुन प्रचंड मनस्ताप सहन करावा लागल्याने आम्ही आमची कोरोना चाचणी प्रयोगशाळा कायमस्वरुपी बंद करीत असल्याचा निर्णयही दातार जेनेटिक्सने घेतला आहे.
दातार कॅन्सर जेनेटिक्सने प्रसिद्ध केलेले पत्रक असे