नाशिक – कोविड-१९च्या प्रसारामुळे तरुण मित्र मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत कासार यांच्या पुढाकाराने व नंदी हिल्स धामणगाव घोटी खुर्द, इगतपुरी येथील एसएमबीटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबीर घेण्यात आले. देवळाली कँम्प रेस्ट कॅम्प रोडवरील देवी मंदिर रेणुकामाता मंदिर परिसर वार्ड. क्रमांक. ६ मधील चंद्रकांत कासार व तरुण मित्र मंडळाच्या वतीने रेणुका माता मंदिर प्रंगगणत हे शिबीर झाले.
वय वर्षे १८ ते ६५ वयोगटातील सुभाष आव्हाड, चेतन गीते, वैभव पाळदे, सुरेश आव्हाड, युवराज कासार, गणेश आहेर, तेजस बागुल, भूषण शिंदे, उमेश गुरुळे, महेश कुवर, रवींद्र मोरे, विक्रम सांगळे, प्रतीक शेटे, बाळा कापसे, गणेश टोचे, अतुल बोराडे, नरेंद्र आडके, रोहित कासार अशा २० जणांना रक्तदान केले.
रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना एसएमबीटी हॉस्पिटलच्या वतीने राज्य रक्त संक्रमण परिषद प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी एसएमबीटी हाँस्पिटलचे डॉ.भारती जाधव, कार्तिक बागुल, सौरभ जाधव, गोरख टोचे, विक्रम डावरे, गणेश टोचे यांच्यासह तरुण मित्र मंडळाचे बबन आव्हाड, राजू भडकवाडे, रामचंद्र बागूल, रामदास टिळे, आनंद कशीद,सचिन गोडसे, विजय वालझाडे आधी. उपस्थित होते.