नवी दिल्ली – कोरोनामुळे २०२० हे वर्ष चित्रपट उद्योगासाठी अत्यंत वाईट गेले. या क्षेत्राची उलाढाल मंदावली. कोट्यवधींचा फटका बसला. आता २०२१ मध्ये चित्रपट उद्योग पुन्हा एकदा पूर्ण सामर्थ्याने पुनरागमन करण्याची तयारीत आहे. त्यामुळेच चित्रपटांच्या रिलीज तारखांची घोषणा केली जात आहे.
यश राज फिल्म्सने २०२१ मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार्या आपल्या चित्रपटांची यादी जाहीर केली आहे. ट्विटरवर शेअर केलेल्या यादीनुसार संदीप अॅण्ड पिंकी फरार हे चित्रपटगृहांमध्ये दाखल होतील. या चित्रपटात अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत आहेत. दिबाकर बॅनर्जी यांनी या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन केले आहे.
बंटी अँड बबली (न्यू ) हा २३ एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात सैफ अली खान, राणी मुखर्जी आणि सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन वरुण व्ही. शर्मा यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती आदित्य चोप्रा यांनी केली आहे.
रणबीर कपूर, वाणी कपूर आणि संजय दत्तचा शमशेरा २५ जूनला रिलीज होणार आहे. २०१८ मध्ये रिलीज झालेल्या संजय दत्तच्या बायोपिक संजूनंतर रणबीर या चित्रपटासह मोठ्या पडद्यावर परतणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन करण मल्होत्रा यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती आदित्य चोप्रा यांनी केली आहे.
https://twitter.com/yrf/status/1362025254420365321