मुंबई – रॉयल एनफील्डच्या बाइक्स आवडणाऱ्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मिटेओर ३५० आणि रॉयल नंतर आता रॉयल एनफील्डने पुढील पाच वर्ष दर तिमाहीत बाईकचा एक नवीन व्हेरीअन्ट बाजारात आणण्याचे ठरवले आहे. मुख्यत्त्वे करून वर्ष २०२१ मध्ये कंपनीने आपल्या अनेक नव्या मॉडेल्सना बाजारात आणण्याची पुरेपूर तयारी केलेली आहे. या वर्षी मध्ये रॉयल एनफील्डच्या चाहत्यांना अनेक नवीन गोष्टी बघायला मिळणार हे नक्की.
रॉयल एनफील्डच्या हिमालयन बाइक्स सुप्रसिद्ध आहेतच. खास पहाडी रस्त्यांवर चालण्यासाठी तयार केलेल्या या गाड्यांच्या रेंजमध्ये लवकरच एका नव्या व्हर्जनची भर पडणार आहे. मिडीया रिपोर्ट्सनुसार हे व्हेरीअंट ६५० सीसीचे असेल आणि सध्या उपलब्ध असलेल्या हिमालयन बाइक्स पेक्षा कितीतरी अधिक दमदार असेल. कंपनीने मात्र अजून याची पुष्टी केलेली नाही.
क्लासिक ३५०
युवकांची पहिली पसंती असलेली क्लासिक ३५० ही बाईक २०२१ मध्ये नवीन रंगरुपासह अपडेट होऊन बाजारात येण्याचा तयारीत आहे. नवीन क्लासिक ३५० ही जे-वन ३४९ मोटरवर आधारित बाईक असेल. याशिवाय यात ट्रिपर टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशनची सुविधा असण्याची शक्यता आहे.
हंटर
आपल्या पूर्वीच्याच रॉयल पोर्टफोलियो मध्ये एनफील्ड २०२१ मध्ये ‘हंटर’ च्या रुपात आणखी एक जबरदस्त बाईक जोडू शकते. या बाईक बद्दल अजून अधिकृतरीत्या काहीही माहिती मिळाली नसली तरी ३५० सीसी च्या बाईकला रिप्लेस करणारी ही एक रेट्रो क्लासिक बाईक असेल असे कळते.
रॉयल एनफील्डच्या ६५० ट्वीन्स २०२१
यावर्षी रॉयल एनफील्ड आपले अपडेटेड ६५० ट्विन्स मॉडेल्ससुद्धा लॉन्च करण्याची शक्यता आहे. रॉयल एनफील्डच्या सर्व बाइक्स चेन्नई मध्ये बनवल्या जातात.