मुंबई – स्वस्त मोबाईल लॉन्च केल्यानंतर आता रिलायन्स जीओने भारतीय मार्केटमध्ये आपला पहिला स्वस्त लॅपटॉप लॉन्च करण्याची तयारी केली आहे. या लॅपटॉपशी संबंधित काही माहितीसुद्धा लिक झालेली आहे.
रिलायन्स जिओ २०२१ च्या पहिल्या सहामाहीत आपला पहिला स्वस्त लॅपटॉप लॉन्च करेल. त्याचे नाव जिओबुक असेल. यात 4जी कनेक्टीव्हीटी आणि Snapdragon 665 प्रोसेसर मिळेल. हा लॅपटॉप JioOS ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करेल. याशिवाय युझर्सला या लॅपटॉपमध्ये जिओ प्रिमियम एपचाही सपोर्ट मिळेल. जिओने लॅपटॉपसाठी चीनच्या ब्ल्यूबँक कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी कंपनीसोबत करार केला आहे, अशीही माहिती पुढे आली आहे. अर्थात त्यात आश्चर्य वाटून घेण्यासारखे काहीच नाही. कारण ही तीच कंपनी आहे जिने जिओ फोन बनविला होता.
रिलायन्स जिओने २०१८ मध्ये जिओफोन2 लॉन्च केला होता. या स्मार्टफोनची किंमत २ हजार ९९९ रुपये आहे आणि तो कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर खरेदीसाठी उपलब्ध आहे. या फोनला २.४ इंचाचा डिस्प्ले, २०००mAh ची बॅटली, ४ जी, क्वार्टी की–बोर्डचा सपोर्ट मिळाला आहे. फोनमध्ये ५१२MB रॅम आणि ४ जीबी स्टोरेजचा सपोर्ट देण्यात आला आहे. त्याला एसडीकार्डच्या मदतीने १२८जीबीपर्यंत वाढवता येणे शक्य आहे. जिओफोन २ च्या बॅकपॅनलमध्ये २ एमपीचा कॅमेरा आणि फ्रंटला ०.३ एमपीचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय वाय–फाय, जीपीएस, एनएफसी सारखे कनेक्टीव्हीटीचे फिचर्सही देण्यात आले आहे. हा फोन व्हॉट्सएप, युट्यूब, फेसबुक, गुगल असिस्टंटला सपोर्ट करतो.
जिओबुकचा प्रोटोटाईप
जिओबुक लॅपटॉपचा प्रोटोटाईपही पुढे आला आहे. लॅपटॉपमध्ये विंडोज आपरेटींग सिस्टीम असल्याचे यात दिसत आहे. स्पेसिफिकेशनमध्ये जिओबुकला 1366×768 पिक्सेल रिझोल्युशनचा डिस्प्ले, 2GB LPDDR4X रॅम आणि 32GB eMMC स्टोरेज देण्यात येईल. सोबतच लॅपटॉपमध्ये कनेक्टीव्हीटीसाठी एचडीएमआय पोर्ट, ब्ल्यूटूथ आणि वाय–फायसारखे फिचर्स असतील.