मुंबई – नौदलाच्या नाविकाची १२ वर्षांची मुलगी आणि दिव्यांग असलेल्या जिया राय हिने एक अनोखा विक्रम रचला आहे. जियाने मुंबईच्या वरळी सी–लिंकपासून गेट वे आफ इंडियापर्यंतचे ३६ किलोमीटरचे अंतर अवघ्या ८ तास ४० मिनीटांत जलतरण करीत पार केले. जबरदस्त जिद्दीच्या जोरावर तिने हा विक्रमच रचला आहे. नाविक मदन राय यांची ती सुपुत्री असून यापूर्वी तिने गिनेस बुक आफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नाव नोंदविले आहे.