कुशीनगर: हजारो किलोमीटर दूर एक अज्ञात देश, भयानक २७ दिवस अन् २७ काळ्या रात्री आणि प्रत्येक क्षण जणू मृत्यू असे दृश्य सामान्यत: भितीदायक चित्रपटांमध्ये घडत आहे, असे आपण पाहतो परंतु बिहारच्या गढिया- बसंतपूरचे रहिवासी मुन्ना चौहान यांच्यासह सात भारतीयांनी लिबियातील अपहरणा दरम्यान असा अनुभव प्रत्यक्ष घेतला. याच वातावरणात त्यांनी सुमारे ६४८ तास श्वास घेतला.
अपहरणकर्त्यांनी त्यांच्या छातीवर स्वयंचलित बंदुका आणि रायफल रोखल्या. या दिवसात असे अनेक प्रसंग आले तेव्हा त्यांना वाटत होते की, आता आपला जीव गमावला आहे. त्याचे असे झाले की, २४ सप्टेंबर रोजी मुन्ना चौहान, बागहाचे अजय शाह, देसाही देवरियाचे महेंद्रसिंग, गुजरातचे उमेंद्री भाई मुलतानी, आंध्र प्रदेशचे व्यंकटराव बटचला, अर्थराज ऊर्फ गोगा, ज्ञानबंदू दीनदयाल उर्फ धनिया यांचे लिबियात अपहरण करण्यात आले . भारतात परतण्यासाठी विमानतळावर जात असताना त्यांचे अपहरण झाले होते.
त्यानंतर गुरुवारी घरी परत आलेल्या मुन्ना चौहान यांनी या आपबितीबाबत बोलताना माहिती दिली की, अचानक चार लोक रस्त्यावर वाहनाने आले आणि त्यांनी आमची गाडी थांबविली. त्यांचा ड्रायव्हर लिबियातील होता. त्याने आम्ही सर्व बंडखोर असल्याचे सांगितले. तसेच आम्ही जे काही सांगतो तसे करा, नाहीतर तुम्हाला ठार मारतो अशी धमकी दिली. ते आणखी जवळ आल्यावर आम्ही सर्व त्याच्या आज्ञा पाळायला लागलो. सर्वांचे चेहरे रुमालाने झाकलेले होते. जेव्हा ते एकमेकांत बोलत असत, तेव्हा आम्हाला काही कळत नव्हते, मात्र त्यातील दोन जण मात्र थोडथोड हिंदीत बोलत होते. त्या बंडखोरांनी आमचे सामान ताब्यात घेतले. तसेच आमच्या कंपनीचे कागदपत्रे, पासपोर्ट आणि व्हिसा इत्यादीसह घेऊन त्यांच्या कारमध्ये बसविले आणि धावण्याचा किंवा ओरडण्याचा प्रयत्न केला तर आमच्यावर गोळीबार करण्याची धमकी दिली. त्यानंतर प्रदीर्घ प्रवासानंतर एका ठिकाणी थांबविले. एका खोलीत रात्री कोंडून ठेवले. काही वेळाने खोलीत येऊन ते म्हणाले की, येथे तुम्हाला फक्त पाणी मिळेल. तसेच ते म्हणाले की, त्यांना कंपनीकडून पैशांची गरज आहे. जोपर्यंत त्यांना पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत त्यांना तिथेच रहावे लागते. त्यानंतर आम्हाला रेडो डे येथे ठेवण्यात आले होते. इथेही दोन ते तीन दिवस आम्हाला अन्न देण्यात येत नव्हते. पण जगण्यासाठी अन्न, पाणी काहीतरी लागत होते म्हणून तेथे आम्ही प्रत्येकाने दोन पाव आणि क्रीम खाल्ले आणि कसे तरी दिवस काढले. त्यानंतर त्या बंडखोरांनी १० ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सांगितले की, तुम्हाला सोडण्यात येत आहे. रात्री आम्ही पाच किमी अंतरावर पायी गेलो . तेथे आमच्या कंपनीतील एका माणसाचा ताबा आम्हाला देण्यात आला. त्यानंतर कंपनीचा माणूस आमच्याबरोबर त्याच्या घरी घेऊन गेला. तेथे रात्र घालवल्यानंतर दुसर्या दिवशी आम्हाला कंपनीत नेण्यात आले. जर भारत सरकारने दबाव निर्माण केला नसता तर आम्ही परत येऊ शकलो नसतो. खरे म्हणजे देवाची आमच्यावर खूप कृपा होती, नाहीतर मृत्यूच्या जबड्यातून सुखरूप परत येणे शक्या नव्हते. ते २७ दिवस आमच्या आयुष्यातील सर्वात भयानक दिवस होते, त्यानंतर आम्ही सर्वांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला.