नाशिक – नाशिक शहरात कोरोनाचा कहर आटोक्यात येत असून तब्बल ६६ दिवसानंतर शहरात कोरोनाचा एकही बळी गेला नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे ही बाब दिलासा देणारी आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून ६ एप्रिल रोजी नाशिक शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर महिन्याभराने म्हणजेच ५ मे रोजी पहिल्या कोरोना बळीची नोंद झाली. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. मात्र, ५ जून, ८ ऑगस्ट आणि १५ ऑगस्ट या तीन दिवशी नाशिक शहरात कोरोनाचा एकही मृत्यू झाला नाही. त्यानंतर आता मंगळवारी (२० ऑक्टोबर) नाशिक शहरात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.
नाशिक शहरातील कोरोना सद्यस्थिती अशी
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ५९ हजार ८४९.
आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ८६९.
पूर्णपणे बरे झालेले – ५५ हजार ८२२.
एकूण मृत्यू – ८४२.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ३ हजार १८५.
पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.२७