वाशिंग्टन – वयाच्या २७ व्या वर्षीच जग सोडून गेलेला प्रसिद्ध अमेरिकन गायक कर्ट कोबेन याचे गिटार तब्बल ६० लाखांना विकली गेली आहे. दरम्यान, आत्महत्येपूर्वी पाच महिने १८ नोव्हेंबर १९९३ रोजी कर्ट कोबेन याने एमटीव्हीवर एक लाईव्ह कार्यक्रम केला होता. युट्युबवर कार्यक्रम तब्बल ३० कोटी वेळा पाहिला गेला आहे.
९० च्या दशकात जेव्हा लाईव्ह अल्बम म्हणून जेंव्हा हा रिलीज झाला, तेव्हा तो सुपरहिट ठरला होता. १९९६ मध्ये याला ग्रॅमी अवॉर्डही मिळाला. लिलाव झालेली गिटार ही याच कार्यक्रमातील आहे. मार्टिन डी – १८ ई या गिटारच्या लिलावाची सुरुवात १० लाख डॉलर्सपासून सुरु झाली. ऑस्ट्रेलियातिल मायक्रोफोन कंपनीचे मालक पीटर फ्रीडमन यांनी ही गिटार खरेदी केली. कोबेन याचे वैशिष्ट्य म्हणजे तो गिटार डाव्या हाताने वाजवत असे. एमटीव्ही च्या कार्यक्रमासाठी हि गिटार त्याने ५ हजार डॉलर्सना विकत घेतली होती.