गुवाहाटी – आसाममधील बागवान येथील नादुरूस्त झालेल्या नैसर्गिक तेल व गॅस विहीरीला गेल्या ५ माहिन्यांपासून लागलेल्या आगीत अनेकांचे मृत्यू झाले आणि आता मोठ्या प्रयत्नानंतर अखेर रविवारी ही आग पूर्णत: कमी झाली आहे, असे तेल इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
ईशान्येकडील राज्यात या भीषण औद्योगिक आपत्तीने पीएसयू मेजर सह तीन कर्मचाऱ्याचा जीव घेतला आणि अनेक जखमी झाले. परदेशी तज्ज्ञांसह अनेक संघटनांच्या संयुक्त प्रयत्नाने यावर नियंत्रण मिळविण्याच्या प्रक्रियेलाही अनेक अडथळे आले होते .ऑईल इंडिया लिमिटेड (ओआयएल) चे प्रवक्ते त्रिदिव हजारिका यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अखेर समुद्रातील द्रावणाने या आगीला नियंत्रणात आणले आहे. हजारीका म्हणाले, सिंगापूरची कंपनी अॅलर्ट आपत्ती नियंत्रण विभागाचे तज्ञ विहीर नियंत्रित करण्यासाठी अंतिम ऑपरेशनमध्ये सक्रियपणे गुंतले आहेत.
तिनसुकिया जिल्ह्यातील बागवान येथील विहीरीला दि.२७ मे २०२० पासून अनियंत्रितपणे गॅस निघत होता आणि ९ जूनला त्या ठिकाणी आग लागली आणि त्या जागी ओआयएलच्या दोन अग्निशमन दलाच्या दोन जवानांचा मृत्यू झाला. ९ सप्टेंबर रोजी ओआयएलच्या २५ वर्षीय इलेक्ट्रिकल इंजिनीअरला विहिरीच्या ठिकाणी काम करत असताना हाय व्होल्टेजच्या विजेच्या धक्क्यामुळे प्राण गमवावे लागले. तसेच २२ जुलै रोजी ओएलआयएल आणि ओएनजीसी तज्ञांना यात मदत करणारे अलर्ट आपत्ती नियंत्रणातील तीन परदेशी तज्ञ वेलहेडमधून एक स्पूल काढत असताना जखमी झाले.