नवी दिल्ली – जगभरातील तब्बल ५४ देशांमध्ये कोरोनाच्या दुसर्या लाटेने कहर केला आहे. मार्च महिन्यात चीन मधून कोरोनाचा फैलाव सुरू झाला आणि जगातील अनेक देशात कोरोनाची पाहिली लाट आली होती. त्यानंतर सहा महिन्यांनी जगातील काही देशांनी कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यात यश मिळविले आहे. आता पुन्हा कोरोनाने अनेक देशांना वेढले आहे.
अमेरिका आणि युरोपातील अनेक देशात कोरोना समक्रमितांचा आकडा प्रचंड प्रमाणावर वाढला आहे. यात मृतांची संख्या १४ लाख १७ हजाराहून अधिक झाली आहे. या महामारीमुळे अनेक देशांचे उद्योग, व्यवसाय ठप्प होऊन विकासाला खिळ बसली आहे. सध्या जगभरातील सुमारे ५४ देशांना कोरोनाच्या दुसर्या लाटेने विळखा घातला आहे. यात २५ युरोपीय देश असून जर्मनी, इटली, स्पेन आणि रशियासारखे लहान-मोठे देश यात समाविष्ट आहेत. त्याचप्रमाणे, आशियातील ११ देशांमध्ये याचा प्रादुर्भाव जास्त जाणवत आहे, त्यात प्रामुख्याने इराण, तुर्की, जॉर्डन, इंडोनेशिया, जॉर्जियासारखे देश समाविष्ट आहेत. याव्यतिरिक्त अमेरिका, मेक्सिको, कनाडा, ब्राझील, कोलंबिया, अर्जेन्टिना आदिसह १८ देशात देखील कोरोनाचा कहर वाढतच आहे.
दरम्यान, भारतात गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचे ४४ हजार ४८९ नवीन कोरोना रुग्ण समस्या समोर आल्या आहेत. यासह देशात कोरोनाची एकूण संख्या ९२ लाख ६६ हजार ७०५ झाली आहे. तसेच २४ तासात ५२४ मृत्यू झाले असून आतापर्यंत एकूण १ लाख ३५ हजार २२३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.