नवी दिल्ली – गुन्हेगार कितीही तरबेज असला तरी काही तरी पुरावा सापडतोच आणि पोलिसांना गुन्हेगाराचा शोध लागतोच. अशाच एका गुन्ह्याची उकल झाली असून तब्बल ५१ वर्षांनंतर एका गुन्ह्याचा उलगडा झाला आहे.
१९६० ते १९७० च्या दशकात अमेरिकेतील सिरियल किलर या गुन्हेगाराने चक्क ग्रह नक्षत्रांच्या शब्दाचा वापर करून तयार केलेले गुप्त संदेश कोडे शेवटी ५१ वर्षानंतर तज्ज्ञांनी सोडवले आहे.
असा आहे क्रूर इतिहास
अमेरिकत ७० च्या दशकात हा किलर सॅन फ्रान्सिस्को भागात एका दहशतवाद्याने अनेक गुन्हे केले होते.परंतु पोलिस त्याला कधीच पकडू शकले नाहीत. त्याने सुमारे ३७ लोकांना ठार केले होते. आता, जवळजवळ ५१ वर्षांनंतर, त्याचे कोडे आणि मीडिया आणि पोलिसांना पाठविलेले लपविलेले संदेश शोधाल्या गेले आहेत. या सीरियल किलरने पोलिस आणि प्रसारमाध्यमे यांना आव्हान देण्यासाठी ज्योतिष चिन्हे आणि संदर्भांचा वापर केला होता. ज्यामुळे त्याची दहशत लोकांमध्ये पसरली होती.
ज्योतिषशास्त्रीय भाषा
आता बर्याच वर्षांनंतर अमेरिकेचे क्रिप्टोग्राफर डेव्हिड ओरंचक, बेल्जियमचे सॉफ्टवेअर अभियंता जरलवान आणि ऑस्ट्रेलियन सॉफ्टवेअर अभियंता सॅम ब्लेक यांच्या पथकाने या मारेकऱ्याचे कोडे सोडवले आहे. हा खुनी तपास यंत्रणांची दिशाभूल करण्यासाठी ज्योतिषशास्त्रीय भाषेतून पोलिसांना निरोप पाठवत असे आणि पोलिसांची नेहमी खिल्ली उडवत असे. एवढेच नव्हे तर पोलिसांनी या प्रकरणातील अनेक संशयितांना अटक देखील केली, परंतु कोणत्याही परिस्थितीत हे सिद्ध केले जाऊ शकत नाही की सिरियल किलर तोच व्यक्ती आहे.