ओवेसींपुढे मोठे आव्हान उभे राहीले आहे. त्याचबरोबर सत्ताधारी टीआरएस पक्ष सध्या अव्वल स्थानी आहे.
या निवडणुकीच्या ताज्या निकालांनुसार एमआयएमने ४४ जागा जिंकल्या असून भाजपाने ४८ जागांवर बाजी मारली आहे. त्याचबरोबर टीआरएस ५५ जागांवर विजय मिळवून एका जागेवर आघाडीवर आहे. निवडणुकांच्या निकालांपैकी सर्वात वाईट कामगिरी काँग्रेसने केली आहे. काँग्रेसच्या
तेलंगाणा प्रदेशाध्यक्षांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. वास्तविक सुरुवातीला येथे भाजपा इतके चांगले प्रदर्शन करू शकेल याची कल्पनाही कुणाला नव्हती. एक्झिट पोलमध्येही टीआरएसने बाजी दर्शविली होती. परंतु भाजपाला कुठेतरी आशा वाटत होती, त्यामुळे पक्षाने आपली संपूर्ण ताकद निवडणूक प्रचारात लावली होती. पक्षाच्या वतीने प्रचारासाठी अमित शहा यांच्यासह अनेक बड्या नेत्यांना मैदानात उतरविण्यात आले होते.
दरम्यान, सत्ताधारी पक्ष टीआरएसने देखील आपले संख्याबळ ६० जागांवर वाढवले आहे, तर भाजप आता ४३ जागांवर आघाडीवर आहे. सध्या मतमोजणी सुरू असून अनेक उमेदवारांमध्ये आघाडी- पिछाडी अशी चुरस चालू आहे. भाजप सध्या ८८ जागांवर आघाडीवर आहे, तर टीआरएस ३३ जागांवर आणि एआयएमआयएम १७ जागांवर आघाडीवर आहे. सध्याच्या ट्रेंडमध्ये भाजप सातत्याने विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे ओवेसींची डोकेदुखी वाढवली आहे.