नवी दिल्ली – कोरोना लस आल्यानंतर बनावट लसीचा बाजार सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. आणि नेमका तोच प्रकार मेक्सिकोमध्ये उघडकीस आला आहे. होंडुरानमधील एका कपड्याच्या कंपनीत एक हजाराहून अधिक कामगारांना नकली स्पुटनिकची लस देण्यात आल्याचा खुलासा मेक्सिकोच्या आरोग्य विभागानं केला आहे.
होंडुारानची कपडा कंपनी ग्रुपो करीमचे मालक पाकिस्तानचे मूळ निवासी मलिक मोहम्मद युसूफ अमदानी बाई आहेत. या घटनेनंतर मेक्सिको सरकार अमदानी बाई यांचा शोध घेत आहेत. एका स्थानिक वृत्तपत्रानुसार, संबंधित लस ग्रुपो करीम कंपनीच्या कामगारांसह इतर व्यावसायिक आणि सरकारी अधिकाऱ्यांना सुद्धा देण्यात आल्याचं चौकशीत निष्पन्न झालं आहे. हे सर्व लोक अमदानी बाई यांचे निकटवर्तीय होते.
बनावट लसीचा पहिला डोस १० मार्चला ओशन व्ह्यू हॉटेल आणि एका क्लिनिकमध्ये देण्यात आला. हॉटेलचा मालक सुद्धा अमदानी बाईच आहे. ग्रुपो करीमच्या कामगारांना पहिला डोस १५ मार्चला देण्यात आला होता. त्याशिवाय मेक्सिको सिटी, युकाटन आणि मेरिडा इथल्या व्यापाऱ्यांना सुद्धा बनावट लसीचा डोस कथितरित्या देण्यात आला आहे.
मोहम्मद युसूफ अमदानी बाई हे संयुक्त राज्य अमेरिका, पनामा,डोमेनिक गणराज्य, ग्वाटेमाला आणि निकारागुआमध्ये कापड उद्योगांचे मालक आहे. होंडुरासचे सर्वात श्रीमंत उद्योजक म्हणून त्यांना पाहिलं जातं.
गेल्या बुधवारी कॅम्पेच्या आंतराष्ट्रीय विमानतळावर कंपनीच्या एका खासगी विमानानं सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पुटनिक लसीचे ५,७०० हून अधिक नकली डोस जप्त केले होते.
दरम्यान, कंपनीकडून स्पष्टीकरण देण्यात आलं की, कोविडचे हजारो डोस आणण्याचं कंपनीचा मानस नव्हता. ही लस कंपनीच्या कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोफत देण्यात येणार होते. कर्मचाऱ्यांना कोरोनापासून बचावासाठी लस देण्याचा प्रयत्न करण्यात आला.