मुंबई/नाशिक – येत्या मंगळवारपासून (२६ जानेवारी) तपोवन एक्सप्रेस (मुंबई ते नांदेड) सुरू होत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून त्याची मोठी मागणी होती. अखेर ती रेल्वेने पूर्ण केली आहे. या रेल्वेमुळे नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्याला मोठा फायदा होणार आहे. या रेल्वेला दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, देवळाली, नाशिकरोड, निफाड, लासलगाव, मनमाड, रोटेगाव, लासूर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, मनवत रोड, परभणी, पुर्णा आणि नांदेड येथे थांबा असणार आहे. कोरोनामुळे ही रेल्वे बंद करण्यात आली होती.