मुंबई – भारतात सध्याचा 4G फोन ५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध नाही. परंतु रिलायन्स जिओने 5G स्मार्टफोनची विक्री ५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत करण्याची योजना आखत आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा लाभ होईल, असे कंपनीचे म्हणणे आहे.
रिलायन्स जिओच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कंपनी ५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीला 5G जी स्मार्टफोन ऑफर करण्याची योजना आखत आहे. सध्या या उपक्रमांतर्गत कंपनी सध्या 2G कनेक्शन वापरत असलेल्या सुमारे ३ कोटी मोबाईल वापरकर्त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करेल.
कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “जिओला उपकरणांची किंमत ५ हजार रुपयांच्या खाली ठेवण्याची इच्छा आहे. जेव्हा आणखी विक्री वाढविल्यास तेव्हा त्याची किंमत सुमारे ३ हजार इतकी असू शकते. सध्या भारतात साधारणतः 5G स्मार्टफोनची किंमत २७ हजार रुपयांपासून सुरू होते. जिओ ही पहिली कंपनी आहे जी भारतातील ग्राहकांना कमी किंमतीत 4G मोबाइल फोन देते.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या 43 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केलेल्या भाषणात सांगीतले केले की, भारताला टू-जी फ्री (टू-जी कनेक्शन मुक्त) बनवावे आणि स्वस्त 4G स्मार्टफोनची गरज यावर भर दिला आहे .कंपनी आपल्या 5G नेटवर्क उपकरणांवर देखील काम करत आहे आणि या उत्पादनांच्या चाचणीसाठी स्पेक्ट्रमचे वाटप करण्यास डीओटीला सांगितले आहे. रिलायन्स जिओच्या विनंतीवरुन सरकारने अद्याप निर्णय घेतला नाही. यावेळी भारतात 5G सेवा नाहीत आणि सरकारने 5G तंत्रज्ञानाची चाचणी करण्यासाठी दूरसंचार ऑपरेटरला स्पेक्ट्रमचे वाटप केलेले नाही.