नाशिक – पाच संशयितांनी घरात घुसून चाकूचा धाक दाखवत कुटुबियांना मारहाण केल्या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुमित्रा माणिक टाळकुटे (रा. प्लॉट नं. १, शिवनंदा अपार्टमेंट, स्वामीनगर, अंबड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सशयित करण कडुसकर व अन्य चार जणांविरुद्ध (नाव व पत्ता माहित नाही) गुन्हा नोंदवला आहे. गेल्या तीन ऑगस्टला फिर्यादीची मुलगी घराकडे येत असताना संशयित करण व त्याच्यासोबत असणारे संशयित शिटी वाजवून गाणे म्हणू लागले. त्यामुळे फिर्यादीची मुलगी घाबवून घरी आली व तिने दरवाजा लावून घेतला. संशयितही तिच्या पाठोपाठ घराकडे आले व ‘तुम्ही आमच्या विरुद्ध खोटी तक्रार दिली’ असे म्हणत दरवाजाला लाथा मारून घरात प्रवेश केला. तसेच चाकूचा धाक दाखवत ‘आम्ही कोणाला घाबरत नाही, जसे तुमच्या मुलाला संपवले, त्याप्रमाणे तुम्हाला देखील सं पवून टाकू’ अशी धमकी देत मारहाण केली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरिक्षक कोल्हे तपास करीत आहेत.







