नवी दिल्ली – श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची लेक अभिनेत्री जान्हवी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आपल्या छोट्या छोट्या गोष्टी ती नेहमीच चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतेच तिने आपले दोन फोटो शेअर केले आहेत. त्यातील एका फोटोत तिची टीम तिला ड्रेस घालायचा प्रयत्न करते आहे, आणि तो घालता घालता जान्हवी घामाघूम झाली आहे. यावेळचे तिचे एक्सप्रेशन्स अगदी पाहण्यासारखे आहेत.
इन्स्टाग्रामवर जान्हवीने शेअर केलेल्या फोटोंवर अनेक कॉमेंट्स येत आहेत. सोमवारी तिने दोन फोटो शेअर केले, यातील एका फोटोत ती लाल गाऊन घालून बसली आहे. हेअर ड्रेसर तिचे केस नीट करते आहे. आणि दुसरा जो फोटो आहे, त्यात ती ड्रेस घालण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. हे फोटो टाकून तिने स्वतः च त्याला बिफोर आणि आफ्टर असं म्हटलं आहे.
जान्हवी पंजाबमध्ये ‘गुड लक जेरी’ या चित्रपटाचे शूटिंग करत होती. पण, शेतकरी आंदोलनामुळे हे शूटिंग थांबले असून ती मुंबईला परतली आहे. चित्रीकरण थांबण्याची ही तिसरी वेळ आहे. या चित्रपटाशिवाय जान्हवी ‘दोस्ताना’ या चित्रपटातही झळकणार आहे.