नाशिक – येथील प्रादेशिक परिवहन विभागाने शिकाऊ आणि पक्का वाहन परवाना (ड्रायव्हिंल लायसन्स)साठी रस्ता सुरक्षा प्रशिक्षण बंधनकारक केले आहे. हे प्रशिक्षण तिडके कॉलनीतील नाशिक फर्स्ट तर्फे ट्रॅफिक एज्युकेशन पार्कमध्ये दिले जात आहे. आतापर्यंत ३० हजार जणांना हे प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे प्रशिक्षण येत्या १ डिसेंबरपासून सक्तीचे करण्यात आले आहे.
असा घ्या प्रशिक्षणाचा लाभ
- हे प्रशिक्षण आठवड्याच्या प्रत्येक मंगळवार, गुरुवार व शनिवार या दिवशी सकाळी ११.०० वाजता ऑनलाईन पद्धतीने झुम (ZOOM) प्लॅटफॉर्म वर घेण्यात येईल.
- ज्यांना हे प्रशिक्षण घ्यायचे आहे त्यांनी www.nashikfirst.com या संकेतस्थळावर जावुन नोंदणी करुन आपली जागा आरक्षित करावी असे आवाहन आर.टी.ओ. नाशिक व नाशिक फर्स्ट च्या वतीने करण्यात आलेले आहे.
- हे प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांना स्वत:चे नाव, ईमेल आय.डी. व मोबाईल नंबर, शिकाऊ वाहन परवाना क्र. व परवाना संवर्ग इ. देणे बंधंकारक आहे.
- ही सर्व माहीती दिल्यानंतर त्यांना नाशिक फर्स्ट कडून बुकिंग कन्फर्म झाल्याचा ईमेल व एस.एम.एस. येईल.
- ट्रेनिंगच्या एक दिवस आधी त्यांना ऑनलाईन ट्रेनिंगची झुम लिंक रजिस्टर्ड ईमेल द्वारे दिली जाईल
- लिंकद्वारे निवडलेल्या वेळेत प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना तसे प्रमाणपत्र त्यांनी रजिस्टर केलेल्या ईमेलवर पाठविण्यात येईल.
- अर्जदाराने सदर प्रमाणपत्र चाचणी अधिकारी यांना दाखवणे बंधनकारक राहिल, असे आरटीओने स्पष्ट केले आहे.
- शिकाऊ चालकांना मार्गदर्शन करण्यासाठी नाशिक फर्स्ट येथे प्रशिक्षित व तज्ज्ञ प्रशिक्षक आहेत. हे प्रशिक्षण व समुपदेशन विना मोबदला दिले जात असल्याचे नशिक फर्स्टचे चेअरमन अभय कुलकर्णी यांनी सांगितले आहे.