मुंबई – ड्रग प्रकरणी अटकेत असलेली कॉमेडीयन भारती सिंह आणि तीचा पती हर्ष लिंम्बाचिया यांना जामीन मंजुर झाला आहे. मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयाने १५ हजाराच्या वैयक्तीक जातमुचलक्यावर हा जामीन दिला आहे. या दोघांच्या घरी एनसीबीने छापा टाकून गांजा जप्त केला होता. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोतर्फे ड्रग्ज विरोधी कारवाईसाठी छापे टाकले जात आहेत. त्यातच आता कॉमेडीयन भारती सिंहच्या व तिचा पती हर्ष लिंम्बाचिया सापळयात अटकले. त्यामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ निर्माण झाली होती..