सोमवार, ऑगस्ट 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

ड्रग्ज रॅकेटप्रकरणी गृहमंत्री देशमुख यांची मोठी घोषणा

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 17, 2020 | 1:45 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
HM 2606

मुंबई – “बॉलिवूडमधल्या काही जणांचा ड्रग रॅकेटशी संबंध असल्याचे उघड होत आहे. त्याची चौकशी झालीच पाहिजे. दोषींवर कारवाईसुद्धा झाली पाहिजे. पण या काहीजणांच्या चुकीमुळे संपूर्ण बॉलीवूड ड्रग रॅकेटमध्ये अडकले असल्याचे म्हणणे योग्य होणार नाही. काही दोषींमुळे संपूर्ण बॉलीवूडची बदनामी करता येणार नाही. नायक आणि खलनायक यात फरक करावाच लागेल,” असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.

देशाच्या उत्तरेकडे फिल्मसिटी उभारण्याची घोषणा झाल्यानंतर अचानकपणे भारतीय चित्रपटसृष्टीचे केंद्र असणाऱ्या मुंबईवर चिखलफेक सुरु झाली. कोट्यावधी रुपयांची उलाढाल असणाऱ्या मुंबईतल्या बॉलिवूडला बदनाम करणाऱ्यांचे यामागचे हेतू लक्षात घ्यायला हवेत. विशिष्ट विचारधारेतून बॉलिवूडवर हल्ले केले जात असल्याची शक्यता आहे. मात्र शंभरपेक्षा अधिक वर्षांच्या मजबूत आणि समृद्ध परंपरेला मुठभरांच्या चिखलफेकीमुळे धक्का लागणार नाही, असा विश्वास मंत्री देशमुख यांनी व्यक्त केला.

बॉलिवुडमधील काही घटक ड्रगच्या आहारी गेल्याच्या संबंधाने चौकशी चालू आहे. बॉलिवुडमधील अपप्रवृत्तींचे समर्थन करण्याचा प्रश्नच नाही. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद घेऊन काम करणारे महाराष्ट्र पोलिस भल्या-बुऱ्यातील फरक ओळखून वाईट प्रवृत्तींचा योग्य समाचार घेतील. काही जणांच्या चुकीमुळे संपूर्ण सिनेसृष्टीला बदनाम करणे योग्य नाही, असे मंत्री देशमुख यांनी स्पष्ट केले.

बॉलिवूडशी संबंधित नुकत्याच घडलेल्या काही घटनांचा गैरफायदा घेत परदेशातल्या हजारो फेक अकाऊंटच्या माध्यमातून मुंबई आणि महाराष्ट्राची बदनामी करण्याचे प्रयत्न कसे झाले, हे एव्हाना उघड झाले आहे. याच विचारधारेच्या लोकांनी आता मुंबई-बॉलिवूडला लक्ष्य केल्याचे दिसत आहे. मात्र त्यांचे हे कारस्थान उधळून लावण्यास महाराष्ट्र पोलिस सक्षम आहेत. बॉलिवूडसह देशातल्या सर्वच सिनेसृष्टीने मुंबईवरील प्रेम आणि विश्वास पूर्वीसारखाच अभेद्य ठेवावा. महाराष्ट्र पोलिस सदैव तुमच्यासोबत आहेत, असा दिलासा मंत्री श्री.देशमुख यांनी दिला. गुन्हा घडून गेल्यानंतर अवतरणारे पोलिस फक्त सिनेमांमध्येच असतात. महाराष्ट्राचे पोलिस गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रसिद्ध आहेत हे बॉलिवूडला बदनाम करु पाहणाऱ्यांनी विसरू नये, असा इशारा त्यांनी दिला.

बॉलिवुडला मुंबईतून हलवण्यासाठी काहींनी देव पाण्यात घालून ठेवल्याचे दिसते आहे. त्यांनी हे लक्षात घ्यावे की, भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके हेच कर्तुत्त्ववान मराठी माणूस आहेत. फाळके यांनी सन 1913 मध्ये ‘राजा हरिश्र्चंद्र’च्या रुपाने चित्रपट सृष्टीची बीजे या देशात सर्वात प्रथम रोवली. भारताला पहिला बोलपट ‘आलमआरा’ हादेखील देशात सर्वप्रथम (1931) मुंबईतचं झळकला. शंभरपेक्षा जास्त वर्षांचा इतिहास असणारी मुंबई हीच देशाच्या सिनेसृष्टीचा केंद्रबिंदू होती, आहे आणि राहील. स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच्या या लौकिकाला कोणी, कितीही प्रयत्न केले तर धक्का लावू शकणार नाही, असे मंत्री देशमुख यांनी बजावून सांगितले.

चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक कुशल मनुष्यबळाची उपलब्धता, चित्रपट व्यवसायाला महाराष्ट्राच्या जनतेकडून मिळणारे अपार प्रेम आणि आदर तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे या व्यवसायाला मिळणारे संरक्षण यामुळे चित्रपटसृष्टीने मुंबईत भक्कमपणे पाय रोवले आहेत. बॉलीवुडमधल्या कोट्यवधी रुपयांच्या उलाढालीवर कलाकार, तंत्रज्ञ, बॅकस्टेज आर्टीस्ट यासारख्या हजारो कुटुंबांचा चरितार्थ आज अवलंबून आहे. कितीही संकटे आली तरी मुंबईला असणारे ग्लॅमर, आर्थिक समृद्धी आणि सुरक्षितता यामुळे बॉलिवूडने मुंबईला नेहमीच पसंती दिली आहे. महाराष्ट्राच्या पोलिस दलावर बॉलिवूडचाच नव्हे तर तेलुगू, मल्याळम, बंगाली, कन्नड, गुजराती, पंजाबी येथील चित्रपट व्यावसायिकांचाही पूर्ण विश्वास आहे. त्यामुळेच देशाच्या कानाकोपऱ्यातून ही मंडळी मुंबईत, बॉलिवूडमध्ये येत राहतात. याचेच दुखणे काहींच्या पोटात असू शकते. त्यातूनच बॉलिवूडच्या पद्धतशीर बदनामीची मोहीम आज चालवली जात आहे, असे मंत्री देशमुख म्हणाले.

शेकडो सिने तारे-तारका स्वातंत्र्यपूर्व काळातल्या लाहोर-कराचीपासून ते देशाच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत नशीब आजमवण्यासाठी येत राहिले आणि कायमचे मुंबईकर झाले. तेलुगू, मल्याळम, बंगाली, कन्नड, गुजराती, पंजाबी सिनेसृष्टीतल्या यशस्वी कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, गायक-गायिका, वादक, लेखक, कवी आदी सर्वांनीच देशपातळीवरची लोकप्रियता मिळवण्यासाठी मुंबईचा आधार घेतला. कारण या मुंबईने, या महाराष्ट्राने सर्वांचे खुल्या दिलाने स्वागत केले. भविष्यात देखील देशातल्या कोणत्याही प्रांतातल्या कलाकारांना भारतीय सिनेसृष्टीचा मुकूटमणी असलेल्या बॉलिवूडमध्ये नशीब आजमावायचे असेल तर महाराष्ट्रातले पोलिस, महाराष्ट्राची जनता तुमचे स्वागतच करेल. मुंबईचे महत्त्व कमी करण्याचे बालिश प्रयत्न करणाऱ्यांनी वेळीच शहाणे व्हावे, असे मंत्री देशमुख यांनी सुनावले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बोरखेडा हत्याकांडाचा खटला जलदगती न्यायालयात

Next Post

जिम, व्यायामशाळांना हिरवा कंदिल; या तारखेपासून सुरू होणार

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post

जिम, व्यायामशाळांना हिरवा कंदिल; या तारखेपासून सुरू होणार

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Gyo9SFeWwAEOeRf

टोल कर्मचाऱ्यांनी लष्करी कर्मचाऱ्यांशी केले गैरवर्तन….एनएचएआयने टोलनाक्याला २० लाखाचा दंड ठोठावत केली ही कारवाई…

ऑगस्ट 18, 2025
modi 111

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यात दूरध्वनीद्वारे संवाद…या मुद्द्यांवर झाली चर्चा

ऑगस्ट 18, 2025
WhatsApp Image 2025 07 21 at 8.31.40 PM 1024x537 1

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या पुढाकाराने चिमुकल्या देवांशीवर यशस्वी शस्त्रक्रिया….

ऑगस्ट 18, 2025
IMG 20250818 WA0341 e1755518236764

गुजराथमधील वनतारा येथे देशभरातील ५४ पशुवैद्यक झाले दाखल…हे आहे कारण

ऑगस्ट 18, 2025
GyoHqaIaEAA9HA9 1920x1749 1 e1755517492732

तिसरी मुंबई आर्थिक विकासाचा नवा अध्याय…या कार्यालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

ऑगस्ट 18, 2025
Gyn5Kq6bkAA2KV6

मुख्यमंत्र्यांनी घेतला राज्यातल्या पावसाचा आढावा…मुंबईत १७० मिलिमिटर पाऊस तर मराठवाड्यातल्या ८०० गावांना अतिवृष्टीचा फटका

ऑगस्ट 18, 2025
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011