नाशिक – जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने सुरु केलेल्या ‘डोनेट अ बुक’ उपक्रमाला गुरुवारी नरेंद्र पाटील यांच्या वतीने ५४० पुस्तके दान करण्यात आली.
‘डोनेट अ बुक’ उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हयातील दानशुर व्यक्तींना पुस्तक दान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत असून नरेंद्र पाटील यांनी ५१ हजार २०० रुपयांची ५४० पुस्तक जिल्हा दिली आहेत. जिल्हा परिषदेत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा परिषद सदस्य यतिंद्र पाटील, यशवंत ढिकले यांच्या प्रमुख उपस्थितीत पुस्तक देण्यात आली. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजीव म्हसकर, कार्यकारी अभियंता राजेंद्र मोने, प्रविण गायकवाड आदि उपस्थित होते. दरम्यान, डोनट अ बुक उपक्रमात सहभाग घेवून पुस्तक दान केल्याबददल नरेंद्र पाटील यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अभिनंदन पत्र देवून कौतूक केले आहे.