रॅलीदरम्यान पत्नी आणि मुलास कोरोनाची लागण झाली असल्याचे त्यांनी सांगितले. मुलाची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असल्याने त्याने केवळ १५ मिनिटांत कोरोनावर मात केली असल्याचा दावा त्यांनी केला. मुलाची कोरोना चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र १५ मिनिटांनी त्यांनी कोरोनामुक्त झाल्याचे सांगितले.
रुग्णसंख्येत पुन्हा वाढ
अमेरिकेत येत्या काही दिवसांत निवडणुका होणार आहेत. ३ नोव्हेंबर रोजी या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्याआधीच ८० हजार नव्या कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. आठवड्याभरात ८४ हजार नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. मिशिगन, नॉर्थ कैरोलिना, पेंसिल्वेनिया, विस्कांसिन आणि ओहियो यासह २९ ठिकाणी कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आल्याचे समोर आले आहे. अमेरीकन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्सनुसार दोन आठव्यात अंदाजे ७ लाखाहुन अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे.