गया (बिहार) – येथील मगध भागात ६२ वर्षीय रामचंद्र दास गेल्या २७ वर्षांपासून डोंगर कापत आहे. राहत असलेल्या ठिकाणी रस्ता तयार व्हावा या प्रयत्नात ते गेल्या २७ वर्षांपासून आहेत. हे काम अद्याप सुरुच आहे. याकाळात त्यांनी एकट्याने डोंगर तोडून रस्ता तयार केला आहे. रामचंद्र दास हे गया जिल्ह्यातील केवटी गावचे रहिवासी आहेत. तेथेच केवटी नावाचा पर्वत आहे. पर्वताच्या एका बाजूला केवटी तर दुसऱ्या बाजूला कतलपूरा गाव आहे. कार्यालयात जाण्यासाठी येथील रहिवास्यांना ७ किलोमीटरचा रस्ता पार करावा लागतो. डोंगर तोडून तयार करण्यात आलेल्या रस्त्यामुळे हे अंतर केवळ तीन किलोमीटरवर आले आहे.
रामचंद्र दास हे मूळ ड्रायव्हर होते. एकदा ट्रक घेऊन गावाकडे येत असतांना मध्ये केवटी डोंगर येत असल्याने त्यांची ट्रक घरापर्यंत पोहचू शकली नाही. त्याचवेळी त्यांनी डोंगर तोडून तेथे रस्ता तयार करण्याचा निर्णय घेतला. मूळ ट्रकवर मजदूरी करणारी ही व्यक्ती रस्ता तयार व्हावा यासाठी दिवसरात्र काम करते आहे. त्यांना चार मुले असून, सध्या ते दिल्ली येथे कंपनीत काम करत आहेत.
दशरथ मांझीने केली सुरुवात
रामचंद्र यांनी सांगितले की, १९९३ साली त्यांची भेट केवटी पर्वत येथील मांझी बाबा म्हणून एका व्यक्तीशी ओळख झाली. त्यावेळी त्यांनी रामचंद्र यांना डोंगर तोडून रस्ता तयार करायला सांगितले. मात्र, रामचंद्र यांनी नकार दिला. तेव्हा स्वतः मांझी बाबा तेथे बसले व त्यांच्या समोर रामचंद्र यांनी कामाला सुरुवात केली.
प्रशासनावर प्रश्नचिन्ह
सदर काम सुरू करतेवेळी संकल्प मनात ठेवून रामचंद्र यांनी काम सुरू ठेवले. तेथील प्रशासनावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. याची कोणीही दखल घेतली नाही, तरी देखील रामचंद्र यांनी काम सुरू ठेवले. गावात देखील कोणी याबाबत जास्त चर्चा केली नाही.