चंद्रपूर – आनंदवनच्या सीईओ डॉ. शीतल आमटे यांनी जून महिन्यातही झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्यांना नागपूरच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तशी माहिती चंद्रपूरचे जिल्हा पोलिस अधिक्षक अरविंद साळवे यांनी दिली आहे. डॉ. आमटे यांच्या आत्महत्येप्रकरणी साळवे प्रथमच पत्रकार परिषद घेऊन सर्व माहिती दिली.
डॉ. आमटे यांचा मृत्यू हा घातपात नसल्याचे आतापर्यंतच्या तपासातून स्पष्ट होत असल्याचे साळवे यांनी सांगितले. डॉ. आमटे यांचा मृत्यू श्वास गुदमरुन झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कुत्र्यांना मारण्यासाठीचे इंजेक्शन घेऊन डॉ. आमटे यांनी महिन्याभरापूर्वी आत्महत्या केली होती. प्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत. डॉ. आमटे या मानसिक तणावात होत्या. त्या नागपूर येथील मानसोपचार तज्ज्ञांकडे औषधोपचार घेत असल्याचेही साळवे यांनी सांगितले.