मंगळवार, ऑगस्ट 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

डॉ.तात्याराव लहाने यांना ‘महात्मा फुले समता’ पुरस्कार, पुणे येथे २८ नोव्हेंबरला वितरण

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 26, 2020 | 6:30 am
in संमिश्र वार्ता
0
IMG 20201126 WA0004

मुंबई –  अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने महात्मा फुले पुण्यतिथीच्या दिवशी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली दिला जाणारा ‘समता पुरस्कार’ यावर्षी ज्येष्ठ नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांना देण्यात येणार आहे. या पुरस्करामध्ये रुपये एक लक्ष, मानपत्र शाल आणि स्मृतीचिन्ह यांचा समावेश आहे. सदर पुरस्कार २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता समता भूमी, फुले वाडा, पुणे येथील कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ यांनी दिली आहे.

या कार्यक्रमासाठी समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी केंद्रीय मानवसंसाधन राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह, माजी खासदार समीर भुजबळ, आ.पंकज भुजबळ, प्रदेश सरचिटणीस प्रा.हरी नरके, महिला प्रदेशाध्यक्षा मंजिरी धाडगे, प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीराव नलावडे, डॉ.कैलास कमोद, जी.जी.चव्हाण यांच्यासह सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर तसेच समता परिषदेचे पदाधिकारी व राज्यभरातून समता सैनिक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जास्त गर्दी न करता नियमांचे पालन करत उपस्थित राहणार आहे.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने दरवर्षी महात्मा फुले पुण्यतिथी समता दिनाच्या निमित्ताने ‘महात्मा फुले समता पुरस्कार’ सामाजिक, राजकीय, साहित्य, पत्रकारिता यासारख्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना देण्यात येतो. या अगोदर माजी केंद्रीय कृषीमंत्री खा.शरदचंद्र पवार,  माजी केंद्रीय मंत्री विरप्पा मोईली, खा.शरद यादव, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे, ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव, ज्येष्ठ लेखक डॉ.भालचंद्र नेमाडे, डॉ.बी.एल.मुणगेकर, लेखिका अरुंधती रॉय, प्रा.डॉ.मा.गो.माळी, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, प्रा.हरी नरके यांच्यासह अनेक दिग्गजांचा समता पुरस्काराने गौरव करण्यात आलेला आहे.

यंदाच्या वर्षी या पुरस्कारासाठी पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांची निवड करण्यात आली आहे. पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी वैद्यकीय क्षेत्रात यश संपादन करत समाजासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी केलेलं हे कार्य केवळ राज्यातील नाही तर देशभरातील वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या आणि येऊ इच्छिणाऱ्या नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. नेत्र शस्त्रक्रियेच्या अत्याधुनिक तंत्रात त्यांनी प्रभुत्व मिळवून महाराष्ट्रातील तसेच देशभरातील ग्रामीण भागातील गोर गरिब आणि आदिवासी भागात नेत्ररोग्यांना शस्त्रक्रियेच्या माध्यमातून दृष्टी प्राप्त करून दिली. आजवर दीड लाखांहून अधिक शस्त्रक्रिया व ५० लाखांहून अधिक रूग्णांवर यशस्वी उपचार करून वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी इतिहास घडविलेला आहे. तसेच वैद्यकीय शिक्षण विभागात काम करतांना अनेक तज्ञ डॉक्टर त्यांनी घडविले आहे. त्यांच्या या वैज्ञानिक ज्ञानासाठी आणि आपल्या अफाट सामाजिक कार्यासाठी त्यांना अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने मानाचा ‘समता पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येत आहे.

या समता पुरस्कार सोहळ्यास सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित राहणार असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जास्त गर्दी न करता फुले प्रेमी, समता सैनिकांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ  यांनी केले आहे.

IMG 20201126 WA0007

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अक्षर कविता – शैलजा कारंडे यांच्या ‘बाभूळबन’ या कवितेचे अक्षरचित्र

Next Post

मनसेचे राज्यभर आक्रमक आंदोलन- वीजबिल भरु नका, राज ठाकरे यांचे आवाहन

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
raj thakare 1

मनसेचे राज्यभर आक्रमक आंदोलन- वीजबिल भरु नका, राज ठाकरे यांचे आवाहन

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

rain1

राज्यात या तारखेपासून पावसाचा जोर कमी होणार, बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

ऑगस्ट 19, 2025
प्रातिनिधिक फोटो

गणेशभक्तांसाठी यंदा रेल्वेच्या ३६७ जादा फेऱ्या…मुख्यमंत्री फडणवीस यांनी मानले केंद्राचे आभार

ऑगस्ट 19, 2025
BVG e1755609847602

मुक्त विद्यापीठाबरोबर ऐतिहासिक सामंजस्य करार…भारतातील हे अत्याधुनिक व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र होणार

ऑगस्ट 19, 2025
result

TAIT परीक्षेचा निकाल जाहीर…१०७७८ उमेदवार यशस्वी, ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

ऑगस्ट 19, 2025
crime1

प्लॉट खरेदी विक्री व्यवहारात लाखों रूपयांना गंडा…फसवणुकीचा गुन्हा दाखल

ऑगस्ट 19, 2025
solar e1703396140989

सौरऊर्जा प्रकल्पांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ही आहे नवीन योजना….

ऑगस्ट 19, 2025
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011