मुंबई – सोनी मराठी या वाहिनीवरील लोकप्रिय मालिका स्वराज्य जननी जिजामाता मध्ये आणखी एक मोठा बदल होणार आहे. येत्या २१ डिसेंबरपासून तो प्रेक्षकांना दिसणार आहे. शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेते डॉ. अमोल कोल्हे हे असणार आहेत. तर जिजाऊंच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी असणार आहेत. सध्या जिजाऊंची भूमिका भार्गवी चिरमुले या करीत आहेत. मालिकेत आता शिवाजी महाराजांचे खरे पराक्रम सुरू झाले आहेत. आणि अशा टप्प्यावरच डॉ. कोल्हे हे शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहेत. दरम्यान, खासदार झाल्यानंतर त्यांची ही प्रथमच प्रमुख भूमिका असणारी मालिका आहे. तसेच, या मालिकेचे निर्मातेही आहेत.
डॉ. कोल्हे यांनी यापूर्वी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची भूमिका केली आहे. त्या प्रचंड गाजल्या आहेत. आता ते पुन्हा शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार असल्याने प्रेक्षकांना मोठी उत्सुकता आहे.
बघा या मालिकेच्या नव्या पर्वाचा प्रोमो
https://twitter.com/sonymarathitv/status/1339818554548498438