नाशिक – कोरोना काळात जिल्हा प्रशासनास अनेक संस्था, व्यक्ती यांनी स्वयंस्पूर्तीने सहकार्य केले, त्यात प्रसारमाध्यमांचेही योगदान मोठे असून नाशिक शहरात गंगापूर रोड येथे आपले कोविड क्लिनिक चालविणारे डॉ. अतुल वडगावकर यांचे कोर्य सर्वांसाठी प्ररणादायी असे आहे, असे गौरवोद्गार पालकमंत्री छगन भुजबळ यांनी काढले.
नाशिकच्या कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. काही शाळा महाविद्यालयांमध्ये शासनाने कोविड निदान केंद्र सुरू केली आहेत. शाळा महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय झाल्यानंतरच या केंद्रांच्या रूळलेल्या, रूजलेल्या कामकाजावर परिणाम होणार नाही यासाठी शासनाशी चर्चा करणार असल्याचेही यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले. या बैठकीत विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दिपक पांण्डेय्, महापालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रेखा रावखंडे यांनी आपापल्या कार्यक्षेत्राची माहिती यावेळी सादर केली.
असे आहे डॉ. वडगावकर यांचे कार्य
डॉ. वडगावकरांनी सुमारे २ हजार कोरोना रूग्णांना यशस्वी उपचार करून त्यांना बरे केले आहे. गृहविलगीकरणाच्या मध्यमातून कोरोना रूग्णांवर उपचार करण्याची नवी संकल्पना त्यांनी राबवली ही संकल्पना नाशिक महानगर पालिकेनेही विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे हे महापालिका आयुक्त असताना राबवली होती. डॉ. वडगावकरांनी खुल्या जागेवर कोरोनाचा कमी होणारा फैलाव विचारात घेवून खुल्या क्लिनिकमध्ये उपचार सुरू केले. त्यात प्रत्येक रूग्णाला गृहविलगीकरण संपेपर्यंत त्यांच्यामार्फत पल्स ऑक्सिमीटर मोफत उपलब्ध करून दिले त्यामुळे रूग्णांना त्याची कमी अर्थिक झळ बसली व त्यांच्यावर निरीक्षणासह नोंदणी ठेवण्यात डॉक्टरांनाही सोपे झाले. डॉ. वडगावकरांच्या या संकल्पनेचे कौतुक करून ग्रामीण भागात हा पॅटर्न राबविण्याबात शिफारस करण्यात येईल, असेही यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी सांगितले.