गळा चिरलेल्या महिलेला दिले जीवदान
नरेश हाळणोर
नाशिक – पंचवटीतील समर्थनगरमध्ये संशयित पतीने पत्नीच्या गळ्यावर वस्त्याऱ्याने वार करीत तिचा गळा चिरला. अत्यंत गंभीर अवस्थेमध्ये तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणले असता, तिची श्वास नलिकाच इजा पोहोचली होती. त्यामुळे तिची जगण्याशी शक्यता नसताना तिच्यासाठी डॉ संजय गांगुर्डे मात्र देवदूतासारखे धावून आले आणि तिचे प्राण वाचले.
गेल्या गुरुवारी (३० जुलै) घरगुती वादातून पती दीपक पवार याने पत्नी पूजा पवार हिच्या गळ्यावर वस्त्याऱ्याने वार केला. यात तिच्या गळ्यावर खोलवर जखम झाली. सिव्हिलमध्ये आणले असता, इएनटी सर्जन डॉ संजय गांगुर्डे यांनी कोणताही बिलंब न लावता शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. यात तिच्या श्वासनलिकेला इजा पोहोचली असल्याने तिच्या जीवाला धोका होता. मात्र डॉ गांगुर्डे यांनी अतिशय संयमाने आणि धीराने घेत यशस्वी शस्रक्रिया केली आणि पूजा पवार या ३२ वर्षीय विवाहितेचा जीव वाचविला. एकीकडे रुग्णाचा जीव गेला म्हणून डॉक्टरांवर हल्ले होत असताना, यातील एका डॉक्टरमुळे एका महिलेचा जीव वाचला हेही समाजाने लक्षात घेतले पाहिजे.
—
तिची वाचविणे प्रथम कर्तव्य होते. श्वास नलिकेला इजा पोहोचल्याने शक्यता फार कमी होती मात्र तरीही आपण तिला वाचवू शकू अशी खात्री होती आणि प्रयत्न केले. तिचा जीव वाचविल्याचे समाधान मिळाले.
– डॉ संजय गांगुर्डे, जिल्हा रुग्णालय, नाशिक
अभिनंदन डॉक्टर गांगुर्डे साहेब आपण ज्या धर्याने महिलेचे प्राण वाचविले त्या बद्दल आपले खूप खूप कौतुक वाटते .
धन्यवाद. आपली प्रतिक्रीया त्यांच्या पर्यंत आम्ही पोहचवू.
ताज्या बातम्यांसाठी आपण भेट देत रहा इंडिया दर्पण लाईव्हच्या वेबपेजला.
इंडिया दर्पण लाईव्ह टीम
सत्य काय आहे ते पडताळून बघावे नुसती प्रसिद्धी नको.