डेन्टल क्षेत्रातील संधी
सध्याचा तरुण वर्ग आपल्या मौखिक आरोग्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने कर्करोग, दंतक्षय व हिरड्यांचे आजार अशा आजारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येते आहे. कर्करोग असलेल्या रुग्णांमध्ये ४८ टक्के रुग्णांना तोंडाचा कर्करोगाने पीडित आहेत. युवा पिढीचे पान मसाला, गुटखा व धुम्रपानाचे प्रमाण ८० टक्के इतके असल्याचे एका आरोग्य तपासणी दरम्यान आढळून आलेले आहे.
नाशिक जिल्हा व परिसरातील या पिडीतांवर वेळेत उपचार व्हावेत या मुख्य हेतूने महात्मा गांधी विद्यामंदिर या संस्थेने नाशिक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी १९९१ मध्ये कर्मवीर भाऊसाहेब हिरे दंत महाविद्यालय सुरू केले. १०० प्रवेश क्षमतेचे हे दंत महाविद्यालयसाठी संस्थेच्या स्वतंत्र सुसज्ज अशा तीन इमारती असून विद्यार्थ्यांना राहण्यासाठी स्वतंत्र अशा वस्तीगृहाची उभारणी संस्थेने महाविद्यालयाच्या आवारातच केलेली आहे आणि पदवीधर पदव्युत्तर शिक्षणाची निकड लक्षात घेऊन २००७ पासून संस्थेने पदव्युत्तर अभ्यासक्रमाची सुरुवात केली आहे. या अभ्यासक्रमासाठी तज्ञ डॉक्टर तसेच शिक्षक व इतर कर्मचारी यांची संस्थेने नेमणूक केली असून आज पाहतो या अभ्यासक्रमाची महाविद्यालयाचे निकालाची परंपरा ९० टक्के पेक्षा अधिक असते.
बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी हा भारतातील सर्वात जास्त मागणी असणारा महत्त्वाचा वैद्यकीय अभ्यासक्रम आहे. ४+१ अशा कालावधीचा पदवी अभ्यासक्रम असून हा अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थी दंतचिकित्सक म्हणून करिअर करू शकतात. दंत आरोग्याबाबत लोकांमध्ये वाढणारी जागृकता हा कोर्स करीत असतो हा कोर्स म्हणजे भारतातील विद्यार्थ्यांसाठी करिअरचा एक वाढता व चांगला पर्याय आहे.
या अभ्यासक्रमासाठी राष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय चाचणी परीक्षा (NEET) देणे आवश्यक आहे. व त्यामध्ये विद्यार्थ्यांची पात्रता मिळाली पाहिजे या परीक्षेतील प्रवेश करण्याचे निकष अनिवार्य असतात. प्रवेशानंतर विद्यार्थी ४ वर्ष शिक्षण घेऊन १ वर्षे इंटर्नशिप नंतर दंतचिकित्सक म्हणून सराव करण्यासाठी डेन्टल कौन्सिल ऑफ इंडियाचे नोंदणी करून स्वतःची क्लिनिक सुरू करू शकतात. तसेच हा कोर्स पूर्ण करणारे दंतचिकित्सक म्हणून काम करण्याचा काही अनुभव घेतल्यानंतर मान्यताप्राप्त महाविद्यालयांमध्ये अध्यापनाचे काम सुद्धा करू शकतात.
हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर दंतचिकित्सक यांना स्वतःचे प्रॅक्टिस मध्ये करिअर करायची इच्छा नसल्यास संबंधितांना प्रस्थापित रुग्णालयाची सल्लागार म्हणून काम करण्याचा आणखीन एक चांगला पर्याय उपलब्ध असतो. तसेच बहुतेक शासकीय रुग्णालय संस्थांमध्ये दंतचिकित्सकासह यांची आवश्यकता असते तर येथेही संबंधितांना संधी उपलब्ध असते. बी. डी. एस. हा पदवी अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यास पदव्युत्तर अभ्यासक्रमात (एम. डी. एस ) प्रवेश घेता येतो. यासाठी (एम. डी. एस ) या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी (NEET)ही राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा देणे आवश्यक असते.
नीट एम.डी.एस भारतातील संस्थाद्वारे पुरविल्या जाणाऱ् या सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एक प्रवेश परीक्षा आपल्याकडे उपलब्ध असलेल्या वैशिष्ट्यांमुळे दंतचिकित्सक त्यांना ज्या ठिकाणी त्यांचे करिअर दर्शन इच्छितात ते क्षेत्र निवडण्याची परवानगी देतात. त्यांच्याकडे यासाठी ९ विषयांची निवड करण्याचा पर्याय उपलब्ध असतो.
काँझर्व्हेटिव्ह दंतचिकित्सा आणि एडोडोंटिक्स,ओरल मेडिसिन आणि रेडिओलॉजी ओरल आणि ककॅसिलोफेशियल सर्जरी, ओरल पथोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी अर्थोडोंटिकस, प्रोथोडोंटिकस ओरल सर्जरी आणि सार्वजनिक आरोग्य दंतचिकित्सा हा तीन वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रमांनंतर दंतचिकित्सक यास अध्यापनाच्या काही संधी सहज उपलब्ध असतात.
२ ते ३ वर्षांच्या अनुभवानंतर दंतचिकित्सक हा प्रदेशात करिअरच्या संधी साठी अर्ज करू शकतो. यासाठी पात्रतेचे निकष पूर्ण करणे आणि सराव करण्याचा परवाना भरण्यापूर्वी संबंधित राज्यातील डेंटल बोर्ड किंवा आरोग्य मंत्रालयाच्या परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक असते.