मुंबई – स्वाध्याय परिवाराचे प्रवर्तक पद्यविभूषण पांडुरंगशास्त्री आठवले (दादा) यांचे जावई व स्वाध्याय परिवाराच्या प्रमुख धनश्री तळवलकर यांचे यजमान डॉ. श्रीनिवास नीळकंठ तळवलकर (रावसाहेब) यांचे अल्पशा आजाराने सोमवारी दु.खद निधन झाले आहे. मंगळवारी त्यांच्यावर ठाणे येथील तत्वज्ञान विद्यापीठात अंत्यसंस्कार करण्यात आले. ते ७२ वर्षाचे होते.
मांटुगा येथील हिंदु कॉलनीत डॉ. श्रीनिवास यांचे निवासस्थान होते. मधुमेह तज्ज्ञ कै. डॉ.नीळकंठ तळवलकर यांचे ते सुपुत्र होते. रावसाहेबाची खंबीर साथ दीदींना होती. त्यांच्या अचानक जाण्याने स्वाध्याय परिवारातील लाखो स्वाध्यायींवर शोककळा पसरली आहे.