मुंबई – बॉक्स ऑफिसचा राजा समजला जाणारा शाहरुख खान आणि त्याच्यासोबत सर्वात यशस्वी जोडी म्हणून लोकप्रिय ठरलेल्या काजोलचा ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाली. आदित्य चोप्रा दिग्दर्शित या सिनेमात सिमरनची मुख्य भूमिका साकारणार्या काजोलने या चित्रपटाला भारतीय सिनेमातील सर्वात रोमँटिक चित्रपट म्हणून ओळख निर्माण केली.
कोणत्याही सिनेमागृहात प्रदीर्घ काळ चालणारा हिंदी चित्रपट म्हणून ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ २० ऑक्टोबर १९९५ रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट अजूनही मुंबईतील मराठा मंदिर थिएटरमध्ये दाखविला आहे. २५ वर्षाच्या यशाच्या निमित्ताने चित्रपटाच्या टीमने आठवणींना उजाळा दिला आहे. हा एक क्लासिक चित्रपट आहे, कारण प्रत्येकामध्ये सिमरन आणि राज यांची झलक दिसते अशी भावना काजोल यांनी व्यक्त केली आहे.
पंजाबमधील मोहरीच्या शेतांपासून ते स्वित्झर्लंडच्या सुंदर ठिकाणांपर्यंत चित्रीकरण करण्यात आलेला, आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा चित्रपट ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’च्या २५ वर्षांच्या यशाची सोशलमीडियावर चर्चा सुरू आहे. बॉलिवूडचा किंग शाहरूख खान आणि काजोल यांच्यातील केमिस्ट्रीने रंगलेल्या या चित्रपटाने आजही प्रेक्षकांच्या मनात स्थान कायम ठेवले आहे. शाहरूख-काजोलच्या अदाकारीने रंगलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर त्याकाळी बक्कळ कमाई केली होती.