मुंबई – १५ डिसेंबरला मान्सून संपल्यावर २० डिसेंबर पासून रॅपिड थंडी वाढणार असून त्यावेळी महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तापमान ५ अंश सेल्सिअसपेक्षा खाली घसरलेले दिसून येईल. २० डिसेंबर ते साधारणपणे २० मार्च या विषुवदिनापर्यंत अशी केवळ तीन महिन्यांचा हिवाळा यंदा असू शकेल. साडे २३ अंश कललेल्या पृथ्वीच्या आसामुळे ती स्वतः भोवती फिरतांना म्हणजे परीवलन व सुर्याभोवती परीभ्रमनामुळे असे घडले.
विदर्भ, मराठवाडा, उत्तर व पश्चिम महाराष्ट्र आणि त्यानंतर कोकण किनारपट्टी असा तापमान घसरण्याचा दर असेल. भौगोलिक परिस्थिती नुसार विदर्भात चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली येथे तापमानात सर्वात जास्त व वेगाने घसरण दिसून येईल. त्यानंतर मराठवाड्यात औरंगाबाद आणि उत्तर महाराष्ट्रात नाशिकमध्ये वेगाने तापमानात घसरण दिसून येईल. महाबळेश्वर येथे यंदा पुन्हा बर्फाची चादर आणि पानांवर गोठलेले दवबिंदू दिसून येऊ शकेल.
यंदा काय बदल
गेल्या वर्षी थंडी १५ नोव्हेंबरनंतर दिवसा व रात्री अशी सुरू झाली होती यावर्षी ती १५ डिसेंबर नंतर दिवसा व रात्री थंडी तसेच धुके असेल. सध्या उत्तरेकडून वारे दक्षिणेकडे जात आहेत परीणामी थंडी उत्तर ते दक्षिण अशी भारतात वाढत आहे.
महाराष्ट्रात सर्वात जास्त थंडी विदर्भ, नंतर मराठवाडा आणि नंतर उत्तर महाराष्ट्रात तापमानात जास्त घसरण होते आहे.
मराठवाड्यात यंदा थंडी मागील वर्षीपेक्षा जास्त असेल हे यंदा वैशिष्टय़पूर्ण असेल कारण पाऊस जास्त झाला आहे जमिनीत पाण्याचा अंश जास्त आहे हे शास्त्रीय कारण त्या मागे आहे.
दिवसा ‘नोव्हेंबर हिट’ आणि रात्री ‘कोल्ड शाॅक’ आताचे ‘न्यू नाॅर्मल’ असणार असून बदललेला मान्सून पॅटर्न व बदललेल्या वादळाच्या पॅटर्न मध्ये आरोग्याची काळजी घेणे अत्यावश्यक असणार आहे. सूर्याच्या उष्णतेमुळे दिवसभर उकाडा आणि साधारणपणे सायंकाळी साडे चार वाजेनंतर तापमानात वेगाने होणारी घसरण आणि रात्री महाराष्ट्रातील तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा खाली घसरलेले असे नोव्हेंबर २०२० मध्ये नवीन वातावरण आपणास अनुभवायला मिळणार आहे अशी माहिती भौतिकशास्त्रज्ञ व हवामान तज्ज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांनी दिली आहे.
‘आॅक्टोबर हिट’ ऐवजी यापुढे ‘नोव्हेंबर हिट’ आपण अनुभवणार आहोत तसेच कमाल आणि किमान तापमान यातील तफावत १० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झाल्याने ‘कोल्ड शाॅक’ चा झटका माणसांबरोबर प्राणी व वनस्पतींना देखील बसणार आहे. परीणामी काळजी आवश्यक आहे. दक्षिण भारतात तसेच महाराष्ट्रातील काही भागात विस्कळीत स्वरूपात यंदा दिवाळीच्या दिवसांत किंवा तयानंतर लगेचच विजांच्या कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह पाऊसाची शक्यता नाकारता येत नाही, मान्सून आणि चक्रीवादळे तसेच थंडीचे स्वरूप कसे असेल, भारतीय अर्थव्यवस्थेला बुस्टरडोस देणारी त्रिसुत्री या बाबत देखील प्रा किरणकुमार जोहरे यांनी आपले संशोधन निष्कर्ष सांगितले.
मान्सून आणि चक्रीवादळे
यंदा आॅक्टोबर मध्ये यंदा एकही चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात बनलेले नाही. मान्सून संपतांना चक्रीवादळांची निर्मिती होते. अशी चक्रीवादळे, पाऊस आणि गारपीट हे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तसेच डिसेंबर व जानेवारी २०२१ मध्ये आपल्याला अनुभवायला मिळेल.
हवामान खाते देशद्रोही नाही
हवामानाची खोटी माहिती देऊन बी-बियाणे, खते यांची विक्री वाढवून शेतकर्यांच्या खिशातून पैसा काढून घेत दुबार पेरणीने शेतकर्यांना देशोधडीला लावून आपले खिसे भरण्याचे काम करण्यासाठी काही हवामान खात्यातील काही शास्त्रज्ञ व अधिकारी भ्रष्ट असण्याची शक्यता नाकारता येत नाही हे जरी खरे असले तरी संपूर्ण हवामान खाते हे परदेशी दलालांना विकले गेलेले नाही आणि हवामान खात्यातील सर्व शास्त्रज्ञ हे देशद्रोही देखील मुळीच नाही.
बदललेल्या वातावरणाशी जुळवून घेतांना रब्बी व खरीप पिकांच्या पिकनियोजनासाठी हवामान शास्त्रज्ञ व कृषी शास्त्रज्ञांनी एकत्रपणे पुढे येऊन शेतकर्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे.
हवामानाचे अंदाज भारतात बंद होणे गरजेचे असून जगातील अद्यावत तंत्रज्ञानाने तसेच सुपर काॅम्प्युटर व डाॅप्लर रडारच्या सहाय्याने ‘रियलटाईम’ हवामान माहिती अक्षांश रेखांश नुसार हवामान शास्त्रज्ञ देशातील प्रत्येक शेतकरी व अब्जावधी लोकांना ‘कस्टमाईज व रियल टाईम वेदर इन्फॉर्मेशन’ देऊ शकतात.
भारतीय अर्थव्यवस्थेला बुस्टरडोसाची त्रिसुत्री
1. भारत सरकार व महाराष्ट्र सरकारने हवामान खात्याला पुर्णकार्यक्षमतेने काम करण्याची मुभा, परवानगी व आवश्यक साधनसामुग्री पुरवण्याची आवश्यकता आहे. तसे झाले तर तो भारतीय अर्थव्यवस्थेला अत्यंत महत्त्वाचा ‘बुस्टरडोस’ ठरेल.
2. हवामान व कृषी विभागाचे विलिनीकरण तसेच या खात्याचे टप्प्याटप्प्याने अंशतः खाजगीकरण, रॅपिड तंत्रज्ञान प्रशिक्षण, शेतकरी जनतेशी नाळ जोडत फिडबॅक मॅकेनिझम आदी अनेक उपाययोजनां द्वारे कार्यक्षमता वाढविल्यास भारतीय अर्थव्यवस्थेसह शेतीच्या मदतीने संपूर्ण जगाचे कल्याण करण्याची ताकद हवामान शास्त्रज्ञांमध्ये आहे.
3. राष्ट्रीय हीत व शेतकरी हित लक्षात घेत भारतात हवामान व कृषी शास्त्रज्ञ यांना अकाउंटिबिलीटी व रिस्पॉन्सिबिलिटी घेत काम करण्याची सवय लावत त्यांना वाव देत चुकणारऱ्या हवामान शास्त्रज्ञांना सुयोग्य संधी देत सुधारणा, देशाचे नुकसान झाल्यास कायदेशीर शिक्षेची तरतूद व याबरोबरच हवामान खात्यावर विश्वास दाखविण्याची नितांत गरज आहे अशी भारतीय अर्थव्यवस्थेला ‘बुस्टरडोस’ देणारी त्रिसुत्री देखील हवामान शास्त्रज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांनी सांगितली आहे.