नाशिक – तंत्रशिक्षण संचालनालय अर्थात डीटीईमार्फत २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली आले. १० सप्टेंबर संध्याकाळी ५ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. डीटीईच्या अधिकृत वेबसाईटवरून याची माहिती देण्यात आली आहे.
दहावी नंतर डिप्लोमा इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे. नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये डिप्लोमाच्या २४ हजार १६० जागा उपलब्ध आहेत. या रिक्त जागांवर प्रवेश देण्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे प्रवेश अर्जासाठी मुदतवाढ दिली आहे.
१० सप्टेंबर संध्याकाळी ५ पर्यंत अर्ज भरता येणार असून १३ सप्टेंबर रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रवेश अर्जात बदल करावयाचे असल्यास त्यासाठी १३, १४ सप्टेंबर असे दोन दिवस देण्यात आले आहेत. १८ सप्टेंबरला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे.
१० ऑगस्टपासून प्रक्रिया सुरु करण्यात आली असून २५ ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली होती. नंतर हि मुदत वाढवून ४ सप्टेंबर करण्यात आली. परंतु रिक्त जागांचा विचार करता डीटीईने आता १० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यासंबधी अधिकमाहिती http://www.dtemaharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे.