मुंबई – नैराश्य म्हणजेच डिप्रेशन हा गेल्या काही वर्षांपासून एक सामान्य आजार होऊन बसला आहे. विशेषतः गेल्यावर्षी कोरोनाच्या आक्रमणानंतर त्यात जास्तीच वाढ झाली. एकतर लॉकडाऊन आणि दुसरीकडे फिजीकल डिस्टन्सींग या दोन गोष्टींमुळे अधिकच डिप्रेशन वाढले.
मृत्यूंची संख्या वाढत गेल्याने नैराश्याचे प्रमाण वाढत गेले. मात्र संशोधनांनी हे सिद्ध केले आहे की असेही काही पदार्थ आहेत जे खाल्ल्यामुळे सकारात्मक प्रभाव पडतो आणि लवकरच मूड चांगला होतो.
सकाळी हे खायला विसरू नका
दही असा एक पदार्थ आहे जो तुमच्या सकाळच्या नाश्त्यात एकदम परफेक्ट आहे. सकाळी दही खाल्ल्यामुळे नैराश्याचा सामना करण्याची शक्ती मिळते, असे संशोधक म्हणतात.
दही प्रकृतीसाठी किती चांगले आहे, हे आपण जाणतोच. दही खाल्ले तर आपण जंक फूडपासून लांब जातो. दह्यात अनेक पोषक तत्व आहेत. प्रोबायोटिक डिप्रेशनमधून मुक्ती मिळविण्यासाठीही दही मदत करते, असे वैज्ञानिक अहवाल सांगतात.
उंदरांवर संशोधन
अभ्यासासाठी संशोधकांनी उंदरांचे नैराश्य मोठ्या प्रमाणात वाढविण्याचा प्रयोग केला. त्यानंतर त्यांनी उंदरातील पूर्वीच्या व आताच्या बॅक्टेरियाच्या प्रमाणाची तुलना केली. त्यात आतड्यांमधील बॅक्टेरिया व मानसिक आजाराचा स्तर यांच्यात सरळ संबंध असल्याचे त्यांना दिसले.
अर्थात या संशोधनात अजून सविस्तर अभ्यासाची आवश्यकता आहे. कारण हा प्रयोग उंदरांवर करण्यात आला आणि उंदरांवर नेमका कसा प्रभाव झाला हे समजणे फार अवघड आहे.