नवी दिल्ली – देशातील दहा टक्के ट्रक लवकरच डिझेलऐवजी लिक्विड नॅचरल गॅस (एलएनजी) वर धावणार आहेत. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, एनएनजी हे भविष्यातील वाहतुकीचे इंधन ठरणार आहे. वाहनांच्या रेट्रो फिटिंगसह मूळ उपकरणेही विकसित केली जात आहेत. यासह ते म्हणाले की, लवकरच एलएनजी टर्मिनल उघडण्याची घोषणा करण्यात येईल.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पहिल्या ५० एलएनजी स्थानकांची पायाभरणी करताना धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, २०० ते ३०० किलोमीटर अंतरावर एलएनजी स्टेशन उभारले जातील. तीन वर्षांत सर्व प्रमुख रस्ते, औद्योगिक केंद्रे आणि खाणकाम क्षेत्रांवर १००० एलएनजी स्थानके असतील. दहा टक्के ट्रक एलएनजी इंधन वापरतील अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. याचा पेट्रोलियम पदार्थांच्या वापरावरही सकारात्मक परिणाम होईल. एलएनजी डिझेलपेक्षा ४० टक्के स्वस्त असून त्याद्वारे प्रदूषण देखील कमी होईल.
अवजड वाहनांमध्ये एलएनजीचा वापर केल्याने केवळ इंधनावरील खर्च कमी होणार नाही तर महागाई रोखण्यासही मदत होईल. धमेंद्र प्रधान यांनी ऑटोमोबाईल उत्पादकांना एलएनजी चालविणारी वाहने तयार करण्याचे आवाहन केले आहे. जेणेकरून हे लक्ष्य शक्य तितक्या लवकर साध्य करता येईल. यामुळे गॅस आधारित अर्थव्यवस्था तयार होण्यास मदत होईल. ते म्हणाले की, कंपन्या ६००० कि.मी. महामार्गासह चार मुख्य महानगरांना जोडण्यासाठी एलएनजी इंधन स्टेशन सुरु केले जातील. सुरुवातीच्या टप्प्यात, परिवहन क्षेत्र एलएनजीच्या दिवसाला २५ दशलक्ष घनमीटर इतका वापरला जाऊ शकतो. सध्या ऊर्जा क्षेत्रातील वायूचा वाटा ६.३ टक्के आहे. २०३०पर्यंत उर्जा क्षेत्रात गॅसचा वाटा १५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे.