डांगसौंदाणे – तळवाडे दिगरच्या विकासाला कुठलाही निधी कमी पडू देणार नाही माझ्या राजकीय जीवनात तळवाडे दिगरच्या जनतेचे मोठे योगदान असुन गावच्या सर्वांगीण विकसासाठी कटिबद्ध असल्याचा शब्द आमदार बोरसे यांनी तळवाडे दिगर ग्रामपांच्यातीच्या माध्यमातुन साकारलेल्या व्यापारी संकुलाचे उद्घाटन प्रसंगी बोलताना दिला आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पठावे गटाचे जिल्हा परिषद सदस्य गणेश अहिरे हे होते. तत्पूर्वी आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येऊन पूजन करण्यात आले. ग्रामपंचायतीने उभारलेल्या व्यापारी संकुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देऊन आज शिवजयंती निमित्त या व्यापारी संकुलाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समितीच्या सभापती इंदूबाई ढुमसे, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बिंदू शर्मा, समितीचे संचालक पंकज ठाकरे, सहाय्यक गटविकास अधिकारी हेमंतकुमार काथेपुरी, विस्तार अधिकारी नितीन देशमुख, आदर्श गाव प्रणेते केदा काकुळते,उपस्थित होते मान्यवरांचा तळवाडे दिगर ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच दिपक पवार उपसरपंच देविदास अहिरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आमदार बोरसे यांनी तळवाडे दिगरच्या ग्रामस्थाशी संवाद साधताना सांगितले की गेली दोन दशके तळवाडेची जनता माझ्याबरोबर आहे. या निवडणुकीत आपण मला भरभरून मदत केली म्हणुन मला आपली सेवा करण्याची संधी मिळाली भविष्यात ही तळवाडे दिगर बरोबर भागाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध असून ठक्कर बाप्पा योजनेतुन व आमदार निधीतून भव्य मंगलकार्यालय साकार होत आहे.
यामुळे तळवाडे दिगरच्या वैभवात नक्कीच या भर पडणार असून भविष्यातील विकासाला कुठलाही निधी कमी पडू देणार नसल्याचा शब्द आमदार बोरसे यांनी देत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी शुभेच्छा दिल्या. तर जिल्हा परिषद सदस्य गणेश आहिरे यांनी सांगितले की गटात विकास कामे करण्यासाठी नेहमी नाशिक मुबंईला जावे लागते गटात जनतेसमोर जरी कमी वेळेस आलो असलो तरी विकासकामांसाठी कायम शासन दरबारी पाठपुरावा करत असल्याने गटात मोठ्या प्रमाणावर विकासकामे करण्यात आली आहेत. तळवाडे दिगर ला भुमीगत गटार रस्ता काँक्रेटिकरण सारखे कामे जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन करण्यात आले असुन भविष्यात ही जिल्हा परिषदेच्या योजना मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध असल्याच सांगत ग्रामपंचायत प्रशासनाच्या कामकाजबद्दल समाधान व्यक्त केले यावेळी आदर्श गाव प्रणेते केदा काकुळते विस्तार अधिकारी नितीन देशमुख यांचे ही भाषणे झाली यावेळी ग्रामपंचायत सदस्य संजय आहिरे,सौ वर्षा धोंडगे ,भरत सोनवणे, भिकुबाई आहिरे, तुळशीराम सोणवणे, रमेश आहिरे, श्रावण ठाकरे, हेमंत जाधव, डॉ मुरलीधर पवार, ग्रामसेवक आर.जे आहिरे ,भास्कर ठाकरे ,युवराज पवार सोपान आहिरे,शांताराम ठाकरे,मोठ्या संख्येने ग्रामस्थ महिला उपस्थित होते प्रास्ताविक कृउबा समितीचे संचालक पंकज ठाकरे यांनी केले तर सुत्रसंचलन यशवंत धोंडगे यांनी केले.