निलेश गौतम
—
डांगसौंदाणे- बागलाण पंचायत समितीच्या आवारात प्रधानमंत्री महाआवास योजनेतील डेमो हाऊस चे भूमिपूजन आज सभापती इंदूबाई ढुमसे उपसभापती ज्योती आहिरे यांच्या उपस्थितीत पार पडले प्रधानमंत्री घरकुल आवास योजने तुन जास्तीत जास्त घरकुलांचे बांधकाम व्हाव्हे यासाठी २० नोव्हेंबर २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत प्रधानमंत्री महाआवस योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेतील घरकुल कसे असावे यासाठी डेमो हाऊस प्रकल्प पूर्ण राज्यात राबिण्यात येत आहे. आज या डेमो हाऊस चे भुमीपूजन सभापती इंदूताई ढुमसे व उपसभापती ज्योती आहिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. बागलाण तालुक्यात १७१ गावे असून १३१ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांमधून घरकुल योजना राबविल्या जातात यामध्ये प्रामुख्याने प्रधानमंत्री आवास योजना ,रमाई घरकुल योजना, शबरी घरकुल योजनेतुन गरजू लाभार्थीना लाभ देण्यात येत आहे. महाआवास योजनेअंतर्गत तालुक्यात जास्तीत जास्त घरकुल पूर्णत्वास नेण्याचा संकल्प बागलाण पंचायत समितीच्या। अधिकारी व पदाधिकाऱयांनी केला असुन आज पर्यंत गत ५ वर्ष्यात प्रधानमंत्री आवाज योजनेतुन ८ हजार ५०६ घरकुलांना मंजुरी मिळाली असुन विविध योजनामधुन घरकुले बांधण्यात आली आहेत तर ५ हजार ८४५ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहेत. पूर्ण झालेल्या घरकुलांना जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणीपुरवठा जोडणी, सौभाग्य योजनेतुन वीजपुरवठा, तर उज्वला योजनेतुन गॅस कनेक्शन देण्यात येत असल्याची माहिती सभापती इंदूताई ढुमसें उपसभापती ज्योती आहिरे यांनी दिली आहे. ही योजना प्रामुख्यान पूर्ण व्हावी यासाठी गटविकास अधिकारी पी.एस .कोल्हे सहा. गट विकास अधिकारी हेमंत काथेपुरी प्रयत्नशील असून बागलानचे विद्यमान आमदार दिलीप बोरसे यांच्या मार्गदर्शनाने तालुक्यातीील घरकुलांचा लक्षांक पूर्ण करण्याचा मानस उपसभापती ज्योती आहिरेे यांनी डेमो हाऊसच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केलाआहे. यावेळी पंचायत समितीचे सदस्य माणिक आहिरे ,शीतल कौर, अतुल आहिरे, विमलबाई सोनावने, रामदास सूर्यवंशी , बाजार समितीचे संचालक संजय सोनवणे ,बांधकाम उप अभियंता अशोक शिंदे ,शाखा अभियंता एस. डी. शिवदे ,सतीश कापडणीस, जीभाऊ कोर आदी उपस्थित होते.
….
योजनेची प्रभावी अंबलबजवाणी साठी आम्ही प्रयत्नशील
प्रधानमंत्री घरकुल योजनेतुन लाभार्थ्यास १ लक्ष २० हजार रुपये अनुदान व नरेगा मधून ९० दिवसांचा २३८ रुपयांप्रमाणे पगार दिला जातो. शौचालय अनुदान १२ हजार ५०० देण्यात येते सौभाग्य योजनेतुन वीज तर जलजीवन योजनेतून नाळजोडणी दिली जाते योजनेची प्रभावी अंबलबजवाणी साठी आम्ही प्रयत्नशील असुन निवड झालेल्या लाभार्थ्यांना लाभ देणे सुरू आहे.
पी .एस .कोल्हे, गटविकास अधिकारी बागलाण
…..