डांगसौंदाणे – राज्यात एकीकडे आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिल्या असतांना कोव्हिड केयर सेंटर म्हणून डांगसौंदाणे ग्रामीण रुग्णालयाची नेमणूक झाल्या पासून येथील बाह्यरुग्ण कक्ष बंद करण्यात आला होता. राज्यात कोरोना रुग्ण संख्याचे प्रमाण कमी झाल्यानंतर बाह्यरुग्ण सेवा देण्याचे आदेश सर्व ठिकाणी देण्यात आल्यानंतर कोव्हिडच्या नावाने येथील वैद्यकीय अधिका-यांनी सुरू केलेली बाह्यरुग्ण तपासणी मात्र नावा पुरताच सुरू केल्याचे आढळून आले आहे. याबाबत गावातील एका जागरूक नागरिकाने रुग्णालयात रात्री ८ ते ८.३० च्या दरम्यान भेट दिली असता या ठिकाणी वैद्यकीय अधिकारीच उपस्थित नसल्याचे आढळून आले. तर कुठलाही आरोग्य कर्मचारी या ठिकाणी दिसून आला नाही. आरोग्य विभागाचे स्पष्ट आदेश असतांना शासकीय सेवेत असलेले जबाबदार अधिकरी कर्मचारीच उपस्थित नसल्याची चर्चा सोशल मीडियात जोरदार झाली आहे आरोग्य सेवेत २४ तास सेवा देणे अपेक्षित असतांना या ठिकाणी असलेले वैद्यकीय अधिकारी हे बाह्यरुग्ण तपासणी नंतर लगेचच मुख्यालय सोडत असल्याचे अनेक वेळा आढळून आले आहेस. याबाबत अनेक वेळा तक्रारी करून ही रुग्णालय प्रशासनात कुठलीही सुधारणा झाल्याचे दिसून येत नाही. तर रुगणालयाचा कारभार प्रभारी वैद्यकीय अधीक्षका कडे आहे. या अधिक्षकांचा रुग्णालय प्रशासनावर कुठलाही वचक नसुन रुग्णालय परिसरातील जनतेला असून नसल्यासारखे आहे. या ठिकाणी आरोग्य सेवेचा पुरता बोजवार उडाला आहे. प्रभारी वैद्यकीय अधिकारी गावातील राजकीय दुफळीचा फायदा घेत गावातच वादावादी लावण्याचा प्रयत्न करीत असल्याचा प्रकार उघड होत आहे. याबाबत गावातील नागरिकांनी वैद्यकीय अधिकाऱ्याना जाब विचारला असता आम्ही कोरोना काळात केलेल्या सेवेचा गावकऱ्यांना काही सोयरे सुतक नसून आम्ही देतो ती आरोग्य सेवा हीच खूप आहे. या रुग्णालयात कोणी ही वैद्यकीय अधिकारी येण्यास तैयार नाही. आहे ती आरोग्यसेवा घ्या असा ही सल्ला या वैद्यकीय अधिकाऱ्याने दिला. गेली अनेक वर्षे रुग्णालयात कर्मचारी संख्या कमी असून अनेक दिवसापासून रक्त तपासणी (cbc) चे सेल काउंटर बंद आहे. एक्सरे टेक्निशियन अभावी एक्सरे मशीन बंद आहे. गेल्या दोन वर्षापासून औषध निर्माण अधिकारी ही नसल्याने हे रुग्णालय नावापुरतेच आहे. आदिवाशी भागाची गरज ओळखून तत्कालीन आरोग्य मंत्री डॉ दौलतराव आहेर व आदिवासी विकास मंत्री ए. टी. पवार यांच्या प्रयत्नातून साकारलेले हे रुग्णालय मात्र जनतेच्या सोयी साठी कामी येताना दिसून येत नाही. गेल्या काही महिन्यापूर्वी सर्पदंश झालेल्या शेतकऱ्याला वेळेवर रुग्णवाहिका व उपचार न मिळाल्याने या शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. यावर तक्रारी होऊन ही कुठलाही बदल सेवेत घडून न आल्याने रुग्णालय प्रशासनाविरोधात स्थानिक नागरिकांसह परिसरातील ग्रामस्थाच्या तक्रारी वाढल्या आहेत.
समितीची बैठक झालेली नाही
गेली अनेक दिवस रुग्णालयात रुग्ण कल्याण समितीची बैठक झालेली नाही रुग्णालयाच्या कारभाराबाबत अनेक वेळा परिसरातील नागरिकांच्या तक्रारी येतात मात्र प्रभारी वैद्यकीय अधीक्षक अनेक वेळा संपर्क साधुन ही मिळून येत नाहीत.
संजय सोनवणे
संचालक बाजार समीती सटाणा
रुग्ण कल्याण समिती ग्रामीण रुग्णालय डांगसौंदाणे
माझी प्रतिनियुक्ती वर नियुक्ती