डांगसौंदाणे (ता. बागलाण) – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता डांगसौंदाणे येथील बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासन व्यापारी वर्गाने घेतल्याने गत तिन दिवस डांगसौंदाणे कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे. ग्रामीण भागात रोजच कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्ष्यात घेता जनतेने खबरदारीचा उपाय म्हणुन पाळलेला जनता कर्फ्युला डांगसौंदाणे वासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. बागलाण तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढत असल्याने खेडोपाडी खबरदारीचा उपाय म्हणून जनता कर्फ्यु पाळण्यात येत आहे. डांगसौंदाणे हे परिसरातील मुख्य बाजारपेठेचे गाव असुन या ठिकाणी बाहेरून येणाऱ्यांची ही संख्या मोठी असते आज मंगळवार आठवडे बाजार असून ही कडकडीत बंद पाळण्यात आला सर्व व्यापारी आस्थापना बंद असल्याने मुख्य बाजरपेठेते शुकशुकाट दिसून आला ग्रामपंचायत प्रशासन आणि स्थानिक पोलिसांनी या तीन दिवसात विना मास्क फिरणाऱ्यावर कार्यवाही करीत कडक बंदोबस्त ठेवला होता.
—