डांगसौदाणे – डांगसौंदाणे ग्रामपंचायत व बुंधाटे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने डांगसौंदाणे येथील शासकीय वसतिगृहाच्या इमारतीत कोरोणा रुग्ण विलगीकरण केंद्राचे उद्घाटन आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते आज करण्यात आले. खासदार सुभाष बाबा भामरे व आमदार दिलीप बोरसे यांच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेले हे विलगीकरण तालुक्यात आदर्श ठरावे यासाठी दोघे ही ग्रामपंचायत प्रशासनाने कंबर कसली आहेत.
बाजारसमीतीचे माजी सभापती व विद्यमान संचालक संजय सोनवणे यांच्या पुढाकाराने हे विलगिकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राची पाहणी बागलांणचे प्रांत अधिकारी विजयकुमार भांगरे, तहसिलदार जितेंद्र इंगळे पाटील, गटविकास अधिकरी पी एस कोल्हे, वैद्यकीय अधिकारी डॉ आर आर निकम ,डॉ माधुरी देवरे यांनी पाहणी करीत ग्रामस्थांना प्रशासनाच्या वतीने सहकार्य व मदत करु असे सांगितले.
यावेळी आमदार बोरसे यांच्या निधीतील ऑक्सीजन मशीचे ही ग्रामीण रुग्णालय साठी लोकार्पण करण्यात आले. नेहमी सार्वजनिक कामत अग्रेसर असलेल्या डांगसौंदाणे नगरीने कोरोना काळात ही आपल्या गावाचे आरोग्य अबाधीत राहण्यासाठी कंबर कसली आहेत. यासाठी स्थानिक पातळीवर सर्व उपाययोजना केल्या आहेत. गेल्या आठवड्यापर्यत गावात एक ही रुग्ण आढळुन आला नव्हता. मात्र या ७ ते ८ दिवसात १५ रुग्ण मिळून आल्याने यांचे सर्वांचे विलगीकरण करणे गरजेचे असल्याने ग्रामपंचायत प्रशासन ने पुढाकार घेत तात्काळ हे विलगीकरण सेंटर सुरू केले आहे. या ठिकाणी सर्व सुविधा पुरविण्यात येणार आहेत. तर रुग्णांना औषध उपचार ही विनाशुल्क करण्यात येणार आहेत .यासाठी गावातील जबाबदार घटकांची विलगीकरण समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी कैलास बोरसे तर उपाध्यक्षपदी नंदू बैरागी याची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीमध्ये संजय सोनवणे, हेमंत चंद्रात्रे ,निलेश गौतम ,सोपान सोनवणे, विजय सोनवणे, पंढरीनाथ बोरसे, राहुल खैरनार ,पंकज बधान ,निवृत्ती सोनवणे, उपसरपंच सुशील सोनवणे, रवींद्र सोनवणे ,अंबादास सोनवणे धनंजय बैरागी,ग्रामसेवक सचिन सूर्यवंशी, प्रशांत आंबेकर ,पोलीस हवालदार प्रकाश जाधव , ग्रामपंचायत कर्मचारी विशाल नेरकर आदींची नियुक्ती करण्यात आली आहे.
कोरोना काळात गावातील गट तट विसरून सर्वजण एकत्र
राजकारणात संवेदनशील गाव म्हणून डांगसौंदाणेची ओळख आहे. मात्र कोरोना काळात विरोधक सत्ताधारी एक होऊन कोरोनाचा सामना करताना दिसत आहेत. ग्रामपंचायत वर संजय सोनवणे यांची सत्ता आहे. तर पारंपारीक विरोधक म्हणून कैलास बोरसे आहेत. मात्र काल कोरोना मुक्त गावासाठी स्थापन केलेल्या समितीच्या अध्यक्षपदी कैलास बोरसे यांची ग्रामपंचायत प्रशासनाने नियुक्ती करीत संकटकाळात गाव एकत्र होत असल्याचे संपूर्ण तालुक्याला दाखवून दिले आहे.
…..
कोरोना नक्की हद्दपार होणार ..
कोरोनाचा आटकाव करण्यासाठी डांगसौंदाणे ग्रामपंचायतने सुरू केलेले विलगीकरण केंद्र तालुक्यातील इतर गावांसाठी नक्कीच आदर्श ठरेल गावातील प्रमुख राजकारणी एकत्र आल्याने या गावातून कोरोना नक्की हद्दपार होणार .
दिलीप बोरसे, आमदार
…..
रुग्ण संख्या शून्यावर आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न
आमचे गाव कायमच आदर्श ठरले आहे वर्षभरात आम्ही कोरोनाच्या आटकावसाठी जे जे केले पाहिजे ते सर्व केले. त्यात आम्ही यशस्वी ठरलो. आता या साप्ताहत सापडलेले रुग्ण हे बाहेरगावी गेल्याने बाधित झाले आहेत. आम्ही २३ एप्रिल ते १ मे पर्यंत कडकडीत बंद पाळला आहे. दवाखाने ,मेडिकल सोडून सर्व आस्थापने बंद केली आहेत. आम्ही कोरोनाची साखळी तोडण्यात यशस्वी होणार रुग्ण संख्या १०० टक्के शून्यावर आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत.
संजय सोनवणे, माजी सभापती सटाणा बाजार समिती
अध्यक्ष आदर्श ग्रामनियोजन समिती, डांगसौंदाणे