सटाणा – ठेंगोडा शिवारातील शेतात मोकळ्या जागेवर जुगाराचा डाव मांडून खेळ सुरू असल्याची माहिती सटाणा पोलिसांना गोपनीय यंत्रणेकडून मिळाली. त्यानंतर पोलिसांनी जुगार अड्डयावर धाड टाकून पाच जणांना रंगेहाथ पकडले आहे. तीन मोटर सायकसह जुगाराचे साहित्य व रोख रक्कम पोलिसांनी हस्तगत केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठेंगोडा शिवारातील दगा तोरवाडे यांच्या शेतातील मोकळ्या जागेवर जुगाराचा डाव सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यावर पोलिसांनी धाड टाकली. येथे अनधिकृतपणे डेमिलन व कल्याण मटका खेळ सुरू असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी जुगार अड्डा उध्वस्त करून योगेश गांगुर्डे(मुंजवाड), अरूण पवार (सौंदाणे), हिरामण पवार (लोहोणेर), दिनेश पगार (ठेंगोडा), बुवाजी (मळगांव) या पाचही जुगार खेळणार्यांना पोलिसांनी ताब्यात घेत जागेवरील तीन मोटरसायकली, जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा ऐवज ताब्यात घेतला. सटाणा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक देवेंद्र शिंदे, पोलिस रविंद्र कोकणी, गांगुर्डे यांनी कार्यवाही केली.