त्र्यंबकेश्वर – तालुक्यातील दुर्गम भागात ठाणापाडा येथे किसान सभेच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. मुसळधार पाऊस सुरू असतांनाही तब्बल १६० जणांनी रक्तदान केले.
जिल्हापरिषद सदस्य रमेश बरफ यांनी रक्तदात्यांना स्वतः अल्पोपहार दिला. किसान सभेचे जिल्हा सचिव इरफान शेख यांनी सर्वप्रथम रक्तदान करून शिबीराची सुरूवात केली. यावेळी सरपंच महेंद्र पवार, लोकप्रतिनिधी, माकप कार्यकर्ते व परिसरातील तरूणांनी यावेळी रक्तदान केले. १८ वर्षाच्या तरुणापासून ६० वर्षाच्या वृद्धापर्यंत नागरिकांचा समावेश राहिला. कोरोना महामारीच्या काळात रक्तदान शिबीरामुळे गरजूंना रक्त मिळण्यास मदत होणार आहे.
ठाणापाडा येथे पहिल्यांदा इरफान शेख यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. एकाच सत्रात १६० रक्त बॅग संकलित करण्यात आल्या. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश मोरे, पोलीस निरीक्षक विशाल टकले, उपसभापती देवराम मौळे, माजी सभापती ज्योती राऊत, पंडीत गावित, माजी सरपंच अंबादास माढी आदी उपस्थित होते.