नाशिक – महापालिकेच्या ठक्कर डोम येथील कोविड सेंटरमध्ये कोरोना बाधित रुग्णांची प्रचंड आबाळ होत असल्याची बाब ‘इंडिया दर्पण’ने उजेडात आणली. येथे असलेल्या कोनो बाधितांना दोन वेळचे जेवण आणि नाश्ताही उपलब्ध नसल्याने त्यांचे हाल होत होते. यासंदर्भातील व्हिडिओही प्रसिद्ध झाला. त्याची तत्काळ दखल महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी घेतली आहे. जेवण पुरविण्यासाठी नियुक्त केलेल्या ठेकेदाराला त्यांनी तत्काळ तंबी दिली. तसेच, नाश्ता आणि जेवण योग्य पद्धतीने पुरविण्याचेही निर्देश दिले. त्यानंतर आज (२ ऑक्टोबर) सकाळीच कोविड सेंटरमध्ये नाश्ता तसेच दुपारी जेवणाची योग्य सुविधा उपलब्ध झाल्याचे सेंटरमधील कोविड रुग्णांनी सांगितले आहे.
कोविड सेंटरमधील हालापेष्टांची माहिती देणारा व्हिडिओ