मुंबई – गोष्ट फार जुनी नाही, एका सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि एका गीतकार यांना एक चित्रपट कथेवर चर्चा करण्यासाठी निसर्गरम्य वातावरणात हॉटेलमध्ये राहायचे होते. त्यामुळे दोन व्यक्ती एका महिन्यासाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये राहिले तर किती खर्च येईल? असा प्रश्न त्यांनी विचारला. तेव्हा उत्तर मिळाले की, काहीच खर्च येणार नाही.
कारण चेकआऊट करताना म्हणजे हॉटेल सोडताना फक्त तेथील कर्मचार्यांचे कौतुक करण्यासाठी एखादे ट्विट टाकावे किंवा इन्स्टाग्राम पोस्ट जोडावी लागेल, अशी अट घालण्यात आली. यावरून सेलीब्रिटीच्या ट्विट आणि पोस्टला किती महत्व आहे, हे दिसून येते. अनेक सेलीब्रिटी हे ट्विट किंवा रिट्वीट करतात आणि लाईक्स देण्यासाठी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टवर क्लिक करतात त्यांना त्यातून खूप पैसा मिळतो.
कोण किती कमावतो…
सध्या सुपर सेलिब्रिटी रिहाना यासाठी अजूनही चर्चेत आहे, आपल्या आश्चर्य वाटेल परंतु ती खूप पैसे मिळवते. त्याचप्रमाणे रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण हे सोशल मीडियावर पैसे कमावणारी प्रथम क्रमांकाची जोडी असल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर प्रियंका चोप्रा दुसऱ्या क्रमांकाची महाग, प्रसिद्ध आणि प्रभावशाली व्यक्ती आहे. कारण प्रियंका चोप्रा एखाद्या विषय, व्यक्ती किंवा त्या जागेबद्दल प्रायोजित इन्स्टाग्राम पोस्ट लिहिण्यासाठी तब्बल दोन कोटी रुपये घेते. फोर्ब्सने तिला सर्वात श्रीमंत इन्स्टाग्रामर मानले आहे.
‘मेक इन इंडिया’ मोहिमेनंतर मिस महाराष्ट्र अभिनेत्री नैना मुकये हिची मागणी सुद्धा लक्षणीय वाढली आहे. एका सोशल मीडिया पोस्टसाठी ती पाच लाख रुपये घेते आणि अनेक हिंदी चित्रपटातील नामांकित अभिनेत्रींनाही इतकी रक्कम मिळत नाही. परंतु एका मालिकेत तिने देवी लक्ष्मीची भूमिका साकारल्यामुळे तिचे नशिबही बदलले आहे. तसेच खेळामध्ये नाव कमावलेला विराट कोहलीचे समाज माध्यमामुळे नशीब बदलले आहे. मात्र सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून पैसे कमावण्याबाबत विराट कोहलीने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.