नवी दिल्ली – अमित शहा यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर सोशल नेटवर्किंग साइट ट्विटरने असे काही केले जे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या ट्विटर अकाऊंटच्या डीपीमधील छायाचित्र (प्रोफाइल फोटो) गुरुवारी रात्री काही काळ काढण्यात आले होते. कोणीतरी अमित शहांच्या डीपीच्या फोटोवर कॉपीराइट असल्याचा दावा केला होता, त्यानंतर ट्विटरने ही कारवाई केली आणि अमित शहा यांचा फोटो डिलीट केला. सदर घटना सोशल मीडियामध्ये जोरदार व्हायरल झाली.
अमित शहा यांनी ट्विटर अकाउंटच्या डीपीवर क्लिक केल्यावर संबंधित चित्र दिसले नाही. प्रोफाइल फोटोच्या जागेवर एक रिक्त पान येत होते आणि त्यावर एक मेसेजही लिहिला होता, ज्यामध्ये कॉपीराइट प्रकरणात फोटो काढून टाकण्याची विनंती केली जात होती. त्यावर संदेश लिहिला होता – ‘कॉपीराइटमुळे फोटो काढण्यात आला आहे’. मात्र काही वेळेनंतर फोटो पुन्हा दिसू लागला. परंतु ट्विटरकडून याविषयी अधिक माहिती देण्यात आलेली नाही. अलfकडेच ट्विटरने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अधिकृत ट्विटर हँडलचे डीपी किंवा बीसीसीआय देखील काढून टाकले होते आणि कंपनीने कॉपीराइट उल्लंघनाचेही कारण दिले होते. विशेष म्हणजे ट्विटरवर अमित शहांचे २३ दशलक्षाहून जास्त फॉलोअर्स आहेत.