नवी दिल्ली – मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट ट्विटरने मंगळवारी जगभरात फ्लीट्स फीचर लॉन्च केले आहे. त्याअंतर्गत २४ तासांनंतर पोस्ट डिलीट होणार आहे. हे अगदी स्नॅपचॅट आणि इंस्टाग्रामसारखे आहे. यात ट्वीट्स, फोटो आणि व्हिडिओचे एकत्रित नाव फ्लीट्स आहे. हे फ्लीट वापरकर्त्यांच्या होम टाइमलाइनच्या सुरवातीला दिसेल तसेच प्रोफाइलमध्ये उपलब्ध असतील. हे फीचर लॉन्च करण्यापूर्वी कंपनीने भारत, ब्राझील, इटली, दक्षिण कोरिया येथे चाचणी केली.
डिझाईन डायरेक्टर जोशुआ हॅरिस आणि प्रॉडक्ट मॅनेजर सॅम हॅव्हनसन यांनी एका ब्लॉग पोस्टमध्ये लिहिले आहे, ट्विटला अधिक सार्वजनिक करणे काही जणांना आवडण्यासारखे आणि रीट्वीट करण्याच्या दबावाशिवाय संभ्रम निर्माण करणारे होते. परंतु आता ट्विटरची पोस्ट एका दिवसानंतर डिलीट होईल, त्यामुळे फ्लीट्स लोकांना आपली मते आणि भावना व्यक्त करण्यात मदत होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
इतर वापरकर्त्यांना फ्लीट्स वैशिष्ट्याद्वारे पोस्ट केलेले फोटो आणि व्हिडिओ रीट्वीट करता येणार नाहीत. तसेच, वापरकर्त्यांना लाईक करणे आणि कमेंट करणे यासारखे पर्याय देखील मिळणार नाही. मात्र, वापरकर्ते मेसेज पाठवून पोस्ट केलेल्या फोटो आणि व्हिडिओवर कमेंट करू शकता.