मुंबई – अनेकांकडे विदेश यात्रा करण्याची अनेक कारणे आहेत, पण सुरक्षित प्रवास आणि शांततापूर्ण सहलीसाठी ट्रॅव्हल इन्शूरन्सवरही लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. हा विमा आपले सामान, पासपोर्ट, तिकीट तसेच इतर गोष्टी हरविल्यावर भरपाई करण्यास मदत करतो. यात फ्लाईट रद्द झाली किंवा फ्लाईटला उशीर झाला तर त्याचीही भरपाई सामील आहे.
याशिवाय ट्रॅव्हल इन्शुरन्स तुम्हाला मेडिकल इमर्जन्सीमध्येही मदतीला धावून येतो. कोव्हीड-१९ च्या वेळी लोकांना याचे महत्त्वही लक्षात आले. वैश्वीक महामारीमुळे आपण हे म्हणूच शकत नाही की जिथे आपण जातोय तिथे धोका आहे. त्यामुळे एका मोठ्या खर्चातून स्वतःला वाचविण्याचा हा उत्तम मार्ग असतो.
अशात ज्यांच्याकडून विमा काढतोय, ते आपल्याला ही सुविधा देत आहेत का, हेही तपासून बघायला हवे. रिलायन्स जनरल इन्शूरन्स तुम्हाला ही सुविधा आनलाईन देत आहे. आपण येथून इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्शूरन्स, एशिया ट्रॅव्हल इन्शूरन्स, शेंगेन ट्रॅव्हल इन्शूरन्स, एन्युअल मल्टीट्रीप, सिनीयर सिटीझन ट्रॅव्हल इन्शूरन्स, स्टुडंट ट्रॅव्हल इन्शूरन्स खरेदी करू शकता. हे सध्या सवलतीच्या दरातही उपलब्ध आहे.
आपण हनीमुनसाठी जात असाल किंवा एकटेच यात्रा करणार असाल तर इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्शूरन्स आणि शेंगेन ट्रॅव्हल इंन्शूरन्स उत्तम आहे. इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्शूरन्स आणि शेंगेन ट्रॅव्हल इन्शूरन्स काढल्यास आपण जगात कोणत्याही देशात जाऊन पर्यटनस्थळांची सफर करू शकता. शेंगेनमध्ये आपण स्वित्झर्लंड, स्पेन, इटली, जर्मनी, पोर्तुगाल, डेन्मार्कआदी देशांमध्ये जाऊ शकता.
विदेशात शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सामानासोबतच आरोग्याचीही चिंता करायला हवी. स्टुडंट इन्शूरन्स या चिंचेतून मुक्त करतो. विदेशात असताना एखाद्या विद्यार्थ्याला आरोग्याची तक्रार असेल किंवा मोठा आजार झाला तर विम्यातून भरपाई होते.