नवी दिल्ली – शेतकरी आंदोलनात ट्रॅक्टर रॅलीनंतर प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावरील हिंसाचारातील संशयित आरोपी शेतकरी नेते सुखदेव सिंह यांनी आपले सहकारी संशयित आरोपी जुगराज यांना ध्वजारोहण करून तोडफोड करण्यास सांगितले अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सुखदेव सिंह यांनी लाल किल्ल्यावरच पंजाबचे अभिनेते दीप सिद्धू आणि जुगराज सिंह यांची भेट घेतली. जुगराज हे सेवादार असून गुरुद्वारामध्ये ध्वजारोहणासाठी तातडीने लाल किल्ल्याच्या खांबावर चढले. अटक केलेले सुखदेव यांनी जामिनावर सुटका झाल्यावर हा खुलासा केला आहे.
पोलिसांनी बक्षीस केले जाहीर – या प्रकरणी गुन्हे शाखेच्या एका अधिकाऱ्यांने सांगितले की, लाल किल्ल्यावरील हिंसाचारानंतर करनाल येथील रहिवासी सुखदेव सिंग (वय 65) हे सिंधू सीमेवर लपले होते. त्यानंतर दि. 6 फेब्रुवारी रोजी सुखदेव सिंह चक्का जाममध्ये सहभागी झाले होते. नंतर ते गुपचूप कुरुक्षेत्राजवळील पिपली गावात गेले. कारण त्याला माहित होते की पोलिसांनी त्यांच्यावर बक्षीस जाहीर केले असून जर घरी गेले तर पोलिस त्यांना पकडतील. म्हणून ते चंदीगडच्या वकिलाला भेटायला गेले होते .
शेतकर्यांची वीज, पाणी तोडले – हरियाणा सरकारने सिंघू सीमेवर धरणे देण्यास बसलेल्या शेतकर्यांची वीज व पाणी तोडले होते. या प्रकरणी चंदीगड उच्च न्यायालयात याचिका दाखल करायची होती. मात्र शेतकरी नेते उच्च न्यायालयात पोहोचण्यापूर्वीच, दिल्ली पोलिसांनी त्यांना इंडियन एरिया, सेक्टर -3, चंदीगड येथे पकडले.
लेखी माहिती – दिल्ली पोलिसांनी औद्योगिक क्षेत्र पोलिस स्टेशनला लेखी अशी माहिती दिली की, सुखदेवसिंग व त्याच्या सहकारी शेतकऱ्यांनी लाल किल्ल्याला गर्दी केली होती आणि त्यांनी जमावाला तोडफोड करण्यास प्रवृत्त केले. तसेच सुखदेव सिंह म्हणले होते की, त्यांनी तोडफोड केली नाही तर सरकार खाली वाकेल कसे. त्या दिवशी त्यांनी लाल किल्ल्यावरील गर्दीचे नेतृत्व केल्याचे सुखदेव सिंह यांनी उघड केले आहे. त्यांनीच जमावाला तोडफोड करायला लावले आणि निधी फडकावला. त्यांनी जुगराज यांना ध्वजारोहण करण्यास सांगितले. सुखदेव सिंह आपल्या साथीदारांसह सिंधू सीमेवरुन लाल किल्ल्यावर पोचले.
जुगराज सिंह हे पाच गुरुद्वारात सेवादार – तरन तारण निवासी जुगराज सिंह हे या भागातील गुरुद्वारातील सेवादार आहे. संपूर्ण क्षेत्रात पाच गुरुद्वारा असून पाचही गुरुद्वारांत ते सेवादार आहेत. गुरुद्वारामध्ये ध्वज रोवण्याचे काम करतो. त्यामुळे त्यांना पोल वर चढण्याचा सराव आहे. प्राथमिक तपासणीनंतर जुगराज सिंगविरोधात कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु दिल्ली पोलिसांनी जुगराज सिंह याच्या अटकेवर एक लाख रुपयांचे बक्षीस ठेवले आहे.